CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, ३६६ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 05:03 PM2021-04-14T17:03:30+5:302021-04-14T17:03:38+5:30

CoronaVirus in Akola: बुधवार, १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५३१ वर गेला आहे.

CoronaVirus in Akola: Three more deaths, 366 newly positive | CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, ३६६ नव्याने पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, ३६६ नव्याने पॉझिटिव्ह

Next

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत होण्याची कोणतीही चिन्हे नसून, बुधवार, १४ एप्रिल रोजी जिल्ह्यात आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५३१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २४५ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये १२१ असे एकूण ३६६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३१,७६०वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,६४७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २४५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १्,४०२ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्येमुर्तिजापूर येथील १७, आलेगाव येथील १५, बोरगाव मंजू, कौलखेड, तेल्हारा व मोठी उमरी येथील प्रत्येकी ११, खडकी येथील नऊ, सिंधी कॅम्प येथील सात, पातूर व गोरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा, गीता नगर, डाबकी रोड व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, आदर्श कॉलनी, बार्शीटाकळी, बाळापूर व जठारपेठ येथील प्रत्येकी चार, उमरी, दापूरा, राऊतवाडी, हरिहर पेठ, वाडेगाव, अमानखाँ प्लॉट, शिवाजी नगर व कोठारी वाटीका येथील प्रत्येकी तीन, वरखेड, कैलास टेकडी, मनब्दा, केशव नगर, तुकाराम चौक, खदान, जीएमसी, तोष्णीवाल लेआऊट, पिंजर, अकोट, शिवसेना वसाहत, लहान उमरी, अंबिका नगर, वाशिम बायपास, रजपूतपुरा व अनिकट येथील प्रत्येकी दोन, शेळद, पिंपरी, किर्ती नगर, शिवपूर, एनपी कॉलनी, गोळेगाव, पिंपळगाव काळे, हिवरखेड, खेल देशपांडे, वांगरगाव, बोचरा, बावने सोनोग्राफी क्लिनिक, तारफैल, अमृतवाडी, पंचशिल नगर, दुर्गा चौक, चांदुर, हिंगणा रोड, बालाजी नगर, गोकूल कॉलनी, गुडधी, निशांत टॉवर जवळ, न्यु भागवत प्लॉट, सिंदखेड, गड्डम प्लॉट, पैलपाडा, मोरगाव, श्रावगी प्लॉट, शास्त्रीनगर, दसरा नगर, जनेशहर रोड, लक्ष्मी नगर, बोंदरखेड, कच्ची खोली, बाजार नगर, गायत्री नगर, कॉग्रेस नगर, गणेश कॉलनी, आळसी प्लॉट, देशमुख फैल, कृषी नगर, जूने शहर, भारती प्लॉट, दगडी पूल, बलवंत कॉलनी, गिरी नगर, मारोती नगर, पनज, न्यु तापडीया नगर, पातूर, उकळी बाजार, नकाशी व सुकडी येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

दाेन महिला, एका पुरुषाचा मृत्यू

पंचशील नगर येथील ७२ वर्षीय महिला, बोरगाव मंजू येथील ६३ वर्षीय महिला व दहिहांडा येथील ७० वर्षीय पुरुष अशा तीघांचा बुधवारी मृत्यू झाला.

 

४,१३६ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,७६० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २७,०९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५३१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,१३६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Three more deaths, 366 newly positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.