CoronaVirus in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 01:23 PM2020-09-30T13:23:21+5:302020-09-30T13:23:33+5:30

सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २३५ झाला आहे.

CoronaVirus in Akola: Six more die; 45 new positives | CoronaVirus in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू; ४५ नवे पॉझिटिव्ह

Next

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरुच असून, बुधवार, ३० सप्टेंबर रोजी अकोला शहरातील चार आणि पातूर व वडद येथील प्रत्येकी एक अशा एकूण सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाच्या एकूण बळींचा आकडा २३५ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७४४० झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २३१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १८६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये गोकुल कॉलनी येथील सात, जठारपेठ येथील सहा, सिंधी कॅम्प येथील चार, डाबकी रोड व केडीया प्लॉट येथील प्रत्येकी तीन, आदर्श कॉलनी येथील दोन, मनकर्णा प्लॉट, रामदासपेठ, छोटी उमरी, राधानगर, अंबिका नगर, आळशी प्लॉट, मुर्तिजापूर, खडकी, सिरसो, हिवरखेड, फिरदोस कॉलनी, भावसारपूरा, शांती नगर, शिवसेना वसाहत, आरएलटी कॉलेज, आरएमओ हॉस्टेल, गुलजारपुरा, शास्त्री नगर, सातव चौक व अकोट येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.

सहा पुरुषांचा मृत्यू
बुधवारी एकूण सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये डाबकी रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, सिव्हील लाईन येथील ५५ वर्षीय पुरुष, मलकापूर येथील ६५ वर्षीय पुरुष, जोगळेकर प्लॉट येथील ७५ वर्षीय पुरुष, वडद, अकोला येथील ७० वर्षीय पुरुष व पातूर येथील ६५ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

१,५१६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,४४० लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ५६८९ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५१६ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: Six more die; 45 new positives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.