CoronaVirus in Akola : जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 17:32 IST2020-04-04T17:32:20+5:302020-04-04T17:32:52+5:30
वाशिम जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात पातुर तालुक्यातील १५ व्यक्ती आल्याने एकच खबळब उडाली आहे.

CoronaVirus in Akola : जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका
अकोला : जिल्ह्यात आतापर्यंत परिस्थिती नियंत्रणात असून, एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही. परंतु, वाशिम जिल्ह्यातील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात पातुर तालुक्यातील १५ व्यक्ती आल्याने एकच खबळब उडाली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात समुह संक्रमणाचा धोका असल्याची चर्चा वैद्यकीय वतुर्ळात सुरू असून नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे. बुलडाणा, वाशिमनंतर आता अमरावतीमध्येही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला आहे. या रुग्णांच्या संपर्कात काही लोक आल्याने, त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणखी इतरांच्याही संपर्कात आले असून, ही एक मोठी साखळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण नसलेल्या अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या समुह संक्रमणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातच थांबावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात आले आहे.
स्वयंशिस्त पाळण्याची गरजकोरोनाचा धोका वाढत असला, तरी शहरात अनेक ठिकाणी नागरिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचे वास्तव आहे. बँकाबाहेर केलेली गर्दी, असो वा सकाळी भाजी बाजारात केलेली गर्दी असो, सर्वच ठिकाणी नागरिक शिस्त भंग करताना दिसून येतात. हा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने वागण्याची गरज असून, स्वयंशिस्त पाळणे आवश्यक झाले आहे.
वैद्यकीय क्षेत्रात भीतीचे वातावरणसर्वोपचार रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णासोबत डॉक्टर व परिचारीकांचा संपर्क येतो. मात्र, यातील कोणता व्यक्ती कोरोणा बाधित आहे, याचा अंदाजा लावणे कठीनच आहे. अशातच येथील डॉक्टरांसह वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुरक्षा संसाधने मिळाली नसल्याने डॉक्टर व इतर वैद्यकीय कर्मचाºयांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
हे करा बाहेर निघणे टाळामास्कचा वापर करावारंवार हात धुवानाका, तोंडाला हात लावणे टाळागर्दीच्या ठिकाणी जाणे टाळाक - जीवनसत्व असलेने अन्न सेवन करा