शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

CoronaVirus in Akola : जीवाला धोका; तरी ‘ते’ कर्तव्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2020 2:28 PM

कोरोना संक्रमणाचा धोका असूनही कर्तव्य बजावत असताना अनेकदा हेटाळणी होत असल्याचे ‘कोरोना योद्ध्यां’नी लोकमतशी बोलताना सांगितले. 

- प्रवीण खेते  लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : शहरात पहिल्यांदाच कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र अशा परिस्थितीतही जीव धोक्यात घालत मनपा वैद्यकीय कर्मचारी सलग १५ दिवसांपासून कर्तव्य बजावत सील करण्यात आलेल्या परिसरात आरोग्य सर्वेक्षण करत आहेत. कोरोना संक्रमणाचा धोका असूनही कर्तव्य बजावत असताना अनेकदा हेटाळणी होत असल्याचे ‘कोरोना योद्ध्यां’नी लोकमतशी बोलताना सांगितले. आयसोलेशन कक्षात कोरोना बाधित रुग्णांवर वैद्यकीय उपचार करत असतानाच, डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाºयांचे एक पथक सील करण्यात आलेल्या भागात वैद्यकीय सर्वेक्षण करत आहेत. यामध्ये मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाºयांचा समावेश असून, ते दररोज सील करण्यात आलेल्या अकोट फैल, बैदपुरा आणि पिंजारी गल्ली या भागात जीव धोक्यात घालून वैद्यकीय सर्वेक्षण करत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लढणाºया या योद्ध्यांसोबत गुरुवारी ‘लोकमत’ने संवाद साधला असता काही कटू सत्यही समोर आले. जोखमीच्या ठिकाणी जाताना या कर्मचाºयांना केवळ मास्क, हॅण्डग्लोज अन् सॅनिटायझर देण्यात आले. तरी कर्तव्यापेक्षा मोठे काय, असे म्हणत ते ‘कोरोना योद्धा’ जीवाची बाजी लावून वैद्याकीय सर्वेक्षण करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याशी संवाद साधत असताना अनेकदा त्यांना अपमानास्पद वागणूकही मिळत असल्याचे वास्तव समोर आले; पण लोकांचा जीव वाचला पाहिजे याच उदार भावनेतून ते आपले कर्तव्य एकनिष्ठेने पार पाडत असल्याचे ‘कोरोना योद्ध्यां’नी लोकमतशी बोलताना सांगितले. 

‘कोरोना’पेक्षा जमणाºया  गर्दीचीच जास्त भीतीकोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सील करण्यात आलेल्या भागात वैद्यकीय कर्मचारी नियमित जातात. यावेळी लोकांना माहिती विचारण्यास सुरुवात करताच अनेकदा मोठ्या प्रमाणात गर्दी केली जाते. शिवाय, विचारलेली माहितीदेखील योग्य पद्धतीने सांगितली जात नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे ‘कोरोना’पेक्षा या गर्दीचीच जास्त भीती वाटत असल्याचे त्या कर्मचाºयांनी सांगितले. 

५१ चमू दररोज करताहेत स्क्रिनिंगमहापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत सील करण्यात आलेल्या परिसरात ५१ चमू दररोज स्क्रिनिंग करत आहेत. त्यामध्ये १६ बैदपुरा परिसरात कार्यरत असून, त्यांच्या निगराणीखाली ३ हजार ३४ घरे आहेत. तर अकोट फैल परिसरात ३५ चमू कार्यरत असून, त्यांच्या निगराणीखाली ५ हजार २५० घरे आहेत. या पथकांमार्फत दररोज २९ हजार १५५ लोकांचे स्क्रिनिंग केली जाते. या पथकांमध्ये आरबीएसकेच्या चार वैद्यकीय अधिकाºयांसह मनापाचे दोन वैद्यकीय अधिकारी, आशा सेविका, बिल कलेक्टर आणि शिक्षकांचा समावेश आहे. 

कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण स्वत:च्या जीवाची पर्वा न करता सेवा देत आहेत; परंतु अनेकदा वाईट अनुभवदेखील येतात; मात्र वैद्यकीय कर्मचाºयांच्या कर्तव्यांची जाण सर्वसामान्यांनी राखून कोरोना योध्यांना सहकार्य करण्याची गरज आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाले, तरच आपण कोरोनाविरुद्धची लढाई जिंकू. - डॉ. अस्मिता पाठक, वैद्यकीय अधिकारी, मनपा, अकोला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला