CoronaVirus in Akola : पाच मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, १२ जणांना ‘डिस्चार्ज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 18:37 IST2020-06-14T18:35:00+5:302020-06-14T18:37:09+5:30
अकोल्यात एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola : पाच मृत्यू; २२ पॉझिटिव्ह, १२ जणांना ‘डिस्चार्ज’
अकोला : अकोल्यात रविवार, १४ जून रोजी अकोला शहरातील चार तर बाळापूरातील एक अशा एकूण पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. तर २२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ५१ वर पोहचला आहे. तर एकूण रुग्णसंख्या हजाराचा टप्पा ओलांडत १००७ वर गेली आहे. दरम्यान, दुपारी आणखी १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३१९ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने सायंकाळी जाहीर केले.
विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख निर्माण झालेल्या अकोला शहरात मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. अकोल्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ४६ होता. रविवारी यामध्ये तब्बल पाच जणांची भर पडत हा आकडा ५१ वर पोहचला आहे. रविवारी, अकोट फैल भागातील ६८ वर्षीय महिला, शंकर नगर येथील ५३ वर्षीय पुरुष, बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला, बापूनगर येथील ५८ वर्षीय पुरुष व सिंधी कॅम्प येथील ५६ वर्षीय पुरुष अशा पाच जणांच्या मृत्यूची नोंद झाली. सिंधी कॅम्प येथील मृत रुग्ण हा खासगी इस्पितळात उपचार घेत होता. तेथे शनिवारी सायंकाळी त्याचे निधन झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२२ पॉझिटिव्ह
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी एकूण १००अहवाल प्राप्त झाले. यापैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर उर्वरित ७८ अहवाल निगेटिव्ह आहेत. यामध्ये सात महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मोठी उमरी येथील दोन, शंकर नगर येथील दोन, सिंधी कॅम्प येथील दोन, सिंदखेड येथील दोन, तर उर्वरित शिवाजीनगर, देवी खदान, गाडगे नगर, नवाबपूरा, खेडेकर नगर, खदान, भांडपुरा, अकोट फैल, तार फैल, गायत्री नगर, गुलजार पुरा,वाडेगाव व बाळापूर येथील रहिवासी आहेत. आजच्या अहवालातील एक रुग्ण हा मंगरूळ पीर जि.वाशीम येथील असून तो वाशीम जिल्हा रुग्णालयातून संदर्भित आहे. त्याचेवर अकोला येथेच उपचार सुरू आहेत. दरम्यान, सायंकाळी प्राप्त सातही अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
आणखी १२ जण झाले बरे
दरम्यान, दुपारनंतर १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील तिघांना घरी पाठवण्यात आले. तर उर्वरीत नऊ जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सात महिला व पाच पुरुष रुग्ण आहेत. त्यातील पाच जण तापडीया नगर येथील, दोन जण गुलजारपुरा येथील तर उर्वरीत अकोट फैल, तार फैल, सिंधी कॅम्प, शिवाजीनगर, खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
प्राप्त अहवाल-१००
पॉझिटीव्ह-२२(२१+१)
निगेटीव्ह-७८
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-१००७
मयत-५१(५०+१),डिस्चार्ज-६३७
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-३१९