शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

CoronaVirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; ६५ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 16:08 IST

खंगनपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

ठळक मुद्देसदर व्यक्तीला २ मे रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामुळे कोविड-१९ आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या ७ असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे.

अकोला : अकोल्यात बस्तान मांडलेल्या कोरोनाने आता चांगलेच विक्राळ रुप धारण केले असून, गत काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, आता कोरानामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. शहरातील खंगनपुरा भागातील एका ६५ वर्षीय कोरोनाबाधित पुरुषाचा बुधवारी सकाळी ८ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदर व्यक्तीला २ मे रोजी उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मंगळवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. यामुळे कोविड-१९ आजाराने मृत्यू झालेल्यांची संख्या ७ झाली असून, एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. दरम्यान, बुधवारी आणखी दोन महिलांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकुन रुग्णांची संख्या ७७ झाल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे.बुधवारी पॉझिटिव्ह आढळलेले दोन्ही रुग्ण महिला असून त्यातील एक ताजनगर येथील तर अन्य एक राधाकिसन प्लॉट येथील रहिवासी असून, त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. रेड झोनमध्ये असलेल्या अकोला जिल्ह्यात रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ५ मे रोजी कोरोनाचे ११ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून रुग्णांची एकून संख्या ७५ झाली होती. यामध्ये मंगळवारी आणखी दोघांची भर पडली. आज रोजी जिल्ह्यात अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ५६, तर एकून रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. जिल्ह्यातील एकून १३ जण कोरोनामुक्त झाले असून, सात जणांचा कोविड-१९ आजाराने मृत्यू झाला आहे. तर एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केली आहे. बुधवारी, एकून ३१ अहवाल प्राप्त झाले, त्यापैकी दोन पॉझिटिव्ह असून, उर्वरित २९ अहवाल निगेटिव्ह असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.आतापर्यंत केवळ अकोला शहरातच असलेल्या कोरोनाचा शिरकाव ग्रामीण भागात झाल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. बाळापूर तालुक्यातील अंत्री व बार्शिटाकळी तालुक्यातील पिंजर हे मुळ गाव परंतु अकोल्यातील शिवनी येथे राहणाºया एकास कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनादेखील क्वारंटीन करण्यात आले असून, त्यांचीदेखील वैद्यकीय चाचणी घेतली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची जबाबदारी ओळखून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासोबतच घरातच राहण्यास प्राधान्य देण्याची गरज आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या