CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ४३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ४० वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 18:28 IST2020-06-09T18:26:43+5:302020-06-09T18:28:52+5:30

मंगळवार, ९ जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला.

CoronaVirus in Akola: Another victim; 43 new positives; Death toll rises to 40 | CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ४३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ४० वर

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ४३ नवे पॉझिटिव्ह; मृतकांचा आकडा ४० वर

ठळक मुद्देदिवसभरात ४३ नव्या रुग्णांची भर पडली.एकूण बाधितांची संख्या ८६४ झाली आहे.कोरोनाबाधितांच्या बळींचा एकूण आकडा ४० वर गेला आहे.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मंगळवार, ९ जून रोजी कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला. तर दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची भर पडली. यामुळे कोरोनाबाधितांच्या बळींचा एकूण आकडा ४० वर गेला आहे. तर एकूण बाधितांची संख्या ८६४ झाली आहे. तथापी, आतापर्यंत ५४५ जणांनी कोरोनावर मात केल्याने सद्या २७९ जणांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

विदर्भात सर्वाधिक कोरोनाबाधितांचा जिल्हा म्हणून अकोल्याची ओळख निर्माण झाली आहे. सोमवार, ८ जून पर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ८२१ होता. त्यामध्ये मंगळवारी दिवसभरात ४३ जणांची भर पडत हा आकडा ८६४ वर पोहचला आहे. मंगळवारी दुपारी गुलशन कॉलनी परिसरातील ७४ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. सदर रुग्णास २६ मे रोजी दाखल करण्यात आले होते. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण २५५ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४३ पॉझिटिव्ह, तर उर्वरित २१२ निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त पॉझिटीव्ह अहवालात सहा महिला व पाच पुरुष आहेत. यामध्ये जुने शहर भागातील दोन, तर उर्वरित माळीपुरा, खदान, सोनटक्के प्लॉट, श्रीहरीनगर सालासर मागे, गाडगेनगर, रेल्वेगेट न्यु तापडीया नगर, अकोट फैल, जवाहरनगर , बाळापूर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी प्राप्त ३२ पॉझिटीव्ह अहवालात १४ महिला व १८ पुरुष आहेत. त्यात पाच जण हैदरपुरा येथील, चार जण न्यू तापडिया नगर, चार जण खदान नाका, दोन जण खडकी येथील, तर दोन जण आदर्श कॉलनी येथील रहिवासी आहेत. तर उर्वरीत सिव्हिल लाईन, शिवाजी नगर, तार फैल, खेडकर नगर, नायगाव, पोलीस क्वार्टर रामदास पेठ, खैर मोहम्मद प्लॉट, बाळापूर, वाशीम बायपास,कैलास टेकडी, सोलसो प्लॉट, अशोकनगर, फिरदौस कॉलनी, हांडे प्लॉट, सोनटक्के प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत ४० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. यापैकी एका कोरोनाबाधिताने आत्महत्या केल्याची नोंद आहे.

प्राप्त अहवाल-२५५
पॉझिटीव्ह-४३
निगेटीव्ह-२१२

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८६४
मयत-४०(३९+१),डिस्चार्ज-५४५
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२७९

Web Title: CoronaVirus in Akola: Another victim; 43 new positives; Death toll rises to 40

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.