शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

CoronaVirus in Akola : आणखी एक बळी; ३८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ३७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2020 11:50 AM

७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाच्या मृत्यूची, तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली.

ठळक मुद्देमृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे.एकूण बाधितांचा आकडाही ७९४ वर गेला आहे.आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत.

अकोला : अकोला जिल्हा व शहरात कोरोना साथीचे थैमान थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून, या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची व बाधित होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रविवार, ७ जून रोजी कोरोनामुळे अकोला शहरातील एकाच्या मृत्यूची, तर ३८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे मृतकांची एकूण संख्या ३७ झाली आहे. तर एकूण बाधितांचा आकडाही ७९४ वर गेला आहे.मे महिन्यापासून रुग्णवाढीच्या सत्राने वेग घेतला असून, महिनाभराच्या कालावधीत अकोला शहर कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून उदयास आला. शनिवारपर्यंत एकूण बाधितांची संख्या ७५६ होती. यामध्ये रविवारी ३८ रुग्णांची भर पडत हा आकडा ७९४ वर गेला. रविवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून एकूण १३८ चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३८ पॉझिटिव्ह, तर उर्वरित १०० निगेटिव्ह आहेत. आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णात १८ महिला व २० पुरुष आहेत. यामध्ये आठ जण खदान येथील, चार जण अकोट फैल, चार जण तार फैल, चार जण खडकी, चार जण जीएमसी क्वार्टर येथील तर उर्वरित रजपुतपुरा, अंत्री मलकापूर, हरिहरपेठ, वाशीम रोड, छोटी उमरी नाका, द्वारका नगर मोठी उमरी, गजानन नगर, बापूनगर टेलिफोन कॉलनी, कैलास टेकडी, तपे हनुमान, देशमुख फैल,  ध्रुव अपार्टमेंट जिल्हा स्त्री रुग्णालया समोर आणि नायगाव येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. दरम्यान, शनिवारी एका ८५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजपुतपुरा येथील रहिवासी असून , त्याला ३१मे रोजी दाखल केले होते. या रुग्णाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला. त्यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ३७ वर पोहचला आहे. एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येची नोंद आहे. आतापर्यंत ५३१ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत २२६ जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.प्राप्त अहवाल-१३८पॉझिटीव्ह-३८निगेटीव्ह-१००आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-७९४मयत-३७(३६+१),डिस्चार्ज-५३१दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२२६

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या