CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 12:34 IST2020-04-18T12:26:43+5:302020-04-18T12:34:56+5:30
अकोला : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण
अकोला : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अकोल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या रुग्णाच्या १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागन झाली असून, सद्या तीची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी देण्यात आली. सोमवार, १३ एप्रिल रोजी अकोला शहरातील एका कोरोनाबाधीत रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले होत व त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
दरम्यान, शुक्रवारी एकून १२ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे फेरतपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता. बैदपुरा भागातील तीन वर्षीय बालकाचा फेर तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता आणखी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
१८ एप्रिल २०२० रोजी सकाळी प्राप्त अहवाल
आज प्राप्त अहवाल- ५५
पॉझिटीव्ह- एक
निगेटीव्ह-५४
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)