शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांच्या NCP चा नेता 'शिवतीर्थ'वर; राज ठाकरेंसोबत केली चर्चा, नेमकं काय घडतंय?
2
२४ वर्षापासून वर्क फ्रॉम होम करायचे मुख्यमंत्री; आता नव्या CM साठी बंगल्याची शोधाशोध
3
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Chandrakant Patil : लोकसभेसाठी सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली; चंद्रकांत पाटलांनी केलं कौतुक
5
IND vs PAK मॅचबद्दल प्रश्न विचारला; सुरक्षा रक्षक संतापला, YouTuber ची गोळ्या झाडून हत्या
6
Tata Motorsची मोठी घोषणा, लवकरच कर्जमुक्त होणार JLR, EV साठीही एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स उघडणार 
7
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
8
"उद्योगपती सत्ताधाऱ्यांसमोर खरे बोलणे टाळतात, पण राहुल बजाज..."; उदय कोटक यांनी सांगितली आठवण
9
Nitanshi Goel : आईने सोडली सरकारी नोकरी, वडिलांनी बंद केला व्यवसाय; 'फूल कुमारी' अशी झाली स्टार
10
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये ठिणगी; नाना पटोलेंचे फोन घेणंही उद्धव ठाकरेंनी टाळलं?
11
Tata Punch EV ते Nexon EV पर्यंत... 'या' 3 इलेक्ट्रिक कारवर १.३५ लाख रुपयांपर्यंत सूट!
12
सेन्सेक्स घसरणीसह बंद, Kotak Bank घसरला; ओएनजीसी-PSU बँकांच्या शेअर्समध्ये बंपर तेजी
13
महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये मुस्लीम महिलेनं दिला बाळाला जन्म; दाम्पत्यानं ठेवलं देवीचं नाव!
14
Nokia 3210 4G भारतात लाँच! YouTube सोबतच UPI पेमेंटची सुविधा, किंमत फक्त ३,९९९!
15
T20 World Cup 2024 Super 8 Scenario : दक्षिण आफ्रिकेचे Super 8 मधील स्थान पक्के; जाणून घ्या पाकिस्तानसह अन्य गटांमध्ये कोणाला बसणार धक्के
16
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
17
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
18
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
19
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
20
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा

CoronaVirus in Akola : आणखी एकाचा मृत्यू; ६२ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2020 1:24 PM

आणखी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६७५ वर गेला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून,सोमवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा १६६ झाला आहे. दरम्यान, आणखी ६२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४६७५ वर गेला आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २१६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ६२ पॉझिटिव्ह असून, उर्वरित १५४ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. यामध्ये २४ महिला व ३८ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये ३२ जण मुर्तिजापूर येथील, बेलुरा ता. पातुर येथील सात जण, पळसो बढे येथील चार जण, चिखली ता मुर्तिजापूर व लहान उमरी येथील तीन जण, अकोट व आळसी प्लॉट येथील प्रत्येकी दोन जण, तर जैन मंदिर, गणेश नगर,महसूल कॉलनी, तांडी, मलकापूर, खदान, खेतान नगर, बेलखेड ता. मुर्तिजापूर व कंचनपुरा पुरद येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.मोठी उमरी येथील पुरुषाचा मृत्यूकोरोनाबळींची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. अकोला शहरातील मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील एका ५० वर्षीय पुरुषाचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.१००४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४६७५ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३५०५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १००४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.  

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या