CoronaVirus in Akola : आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 13:21 IST2020-09-06T12:51:43+5:302020-09-06T13:21:51+5:30
अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७८ वर गेली आहे.

CoronaVirus in Akola : आणखी ४८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, रविवार, ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात कोरोनाचे आणखी ४८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ४५६३ वर गेला आहे. दरम्यान, अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७८ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित २८९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये २२ महिला व २८ पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णांमध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील कान्हेरी येथील २२, तेल्हारा येथील सहा, बाळापूर येथील चार, सस्ती, आळंदा, गोरेगाव व हातरुन येथील प्रत्येकी दोन, पातूर, चान्नी, सिंदखेड, लहान उमरी, मुर्तिजापूर, राऊत वाडी, जूना कपडा बाजार व श्रावगी प्लॉट येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
९७८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४५६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३,४२० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १६५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ९७८ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.