शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

CoronaVirus in Akola : ग्रामीण भागात ९५९२ प्रवासी १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 6:05 PM

अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले.

अकोला: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात‘ लॉकडाऊन’ तर राज्यात संचारबंदी लागू झाली. या काळात म्हणजेच १० मार्च ते ३ एप्रिल या कालावधीत देशभरातून अकोला जिल्ह्यात १९०८१ प्रवासी दाखल झाले. त्या प्रवाशांची आरोग्य तपासणी ग्रामीण भागातील केंद्रांमध्ये करण्यात आली. अकोला जिल्ह्यात पोहोचण्याच्या दिनांकापासून १४ दिवसांच्या ‘क्वारंटीन’ कालावधीत त्यांना ठेवण्यात आले. त्यापैकी ९४८९ प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी उद्या सोमवारी पूर्ण होत आहे. उर्वरित ९५९२ प्रवाशांना १७ एप्रिलपर्यंत ‘क्वारंटीन’ ठेवण्यात आले. त्यांनी खबरदारी म्हणून या काळात घरातच राहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी केले.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो लोक कामानिमित्त देश, राज्यातील विविध शहरांमध्ये होती. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ‘लॉकडाऊन’ झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत गेला. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ग्रामीण भागातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक, वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुख्यालयी ठेवत त्यांची आरोग्य तपासणी केली. त्यामध्ये २२ मार्चपासून दैनंदिन येणाºया प्रवाशांचीही तपासणी करण्यात आली. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्यांपैकी सर्वांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये पुढील उपचाराची गरज असलेल्या तसेच संदिग्ध म्हणून २०६ व्यक्तींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. त्यापैकी ३४ जणांना ‘आयसोलेशन’मध्ये ठेवण्यात आले. तसेच १४ दिवसांपर्यंत ‘क्वारंटीन’ केलेल्यांची संख्या ६०३ एवढी आहे. त्याशिवाय, बाहेर जिल्ह्यातून दाखल झाल्याने घरातच ‘क्वारंटीन’ केलेल्या सर्व प्रवाशांची संख्या ४ एप्रिलपर्यंत १९२९६ एवढी झाली आहे. त्यानुसार शनिवारपर्यंत पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित केलेल्या प्रवाशांची संख्या २२० वर पोहोचली आहे. दर दिवशी आलेल्यांचाही ‘क्वारंटीन’ कालावधी निश्चित केला जात आहे.

- ‘क्वारंटीन’मध्ये असलेले प्रवासी२२ मार्च रोजी तपासणी झालेल्या तसेच ‘क्वारंटीन’मध्ये असलेल्या १०८० प्रवाशांचा कालावधी ५ एप्रिल रोजी पूर्ण झाला. २३ मार्च रोजीआलेल्या ३१८६ प्रवाशांचा उद्या ६ एप्रिल रोजी कालावधी संपुष्टात येत आहे. ३ एप्रिलपर्यंत दाखल झालेल्या एकूण प्रवाशांचा ‘क्वारंटीन’ कालावधी १७ एप्रिल रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत ग्रामीण भागातील संबंधित प्रवासी व त्यांच्या कुटुंबीयांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आसोले यांनी केले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस