शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

CoronaVirus in Akola : एकाच दिवशी ७२ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ५०७

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 8:13 PM

बुधवार, २७ मे रोजी दिवसभरात तब्बल ७२ रुग्णांची भर पडत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५०७ झाला आहे.

ठळक मुद्देबुधवारी दिवसभरात ३०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात २९ महिला तर ४३ पुरुष रुग्ण आहेत. २६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : अकोल्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेली कोरोना संसर्गाची घोडदौड सुरुच असून, बुधवार, २७ मे रोजी दिवसभरात तब्बल ७२ रुग्णांची भर पडत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५०७ झाला आहे. दरम्यान, २६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील मृतकांची संख्याही २८ झाली असून, आतापर्यंत ३१५ रुग्ण बरे झाल्यामुळे सद्या १६४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात ३०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी ७२ जण पॉझिटिव्ह असून, २३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात २९ महिला तर ४३ पुरुष रुग्ण आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १३ जण हे एकट्या हरिहर पेठ भागातील रहिवासी आहेत. मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अकोट फैल येथील अकरा, रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन, अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर उर्वरित महसूल कॉलनी, रजतपुरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रुग्ण सापडले असून, अकोला शहर हे विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत २८ कोरानोबाधितांचा मृत्यू (एक आत्महत्या)झाला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही दिलासा देणारी आहे. आतापर्यंत ३१५ रुग्ण कोरोनातून सावरले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.२६ जणांना डिस्चार्जआज दुपारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल-५०७मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-३१५दाखल रुग्ण ( अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६४प्राप्त अहवाल-३०८पॉझिटीव्ह-७२निगेटीव्ह-२३६

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या