CoronaVirus in Akola : एकाच दिवशी ७२ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ५०७
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 20:15 IST2020-05-27T20:13:39+5:302020-05-27T20:15:14+5:30
बुधवार, २७ मे रोजी दिवसभरात तब्बल ७२ रुग्णांची भर पडत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५०७ झाला आहे.

CoronaVirus in Akola : एकाच दिवशी ७२ जण पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण ५०७
अकोला : अकोल्यात मे महिन्याच्या सुरुवातीपासून सुरु झालेली कोरोना संसर्गाची घोडदौड सुरुच असून, बुधवार, २७ मे रोजी दिवसभरात तब्बल ७२ रुग्णांची भर पडत एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ५०७ झाला आहे. दरम्यान, २६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यातील मृतकांची संख्याही २८ झाली असून, आतापर्यंत ३१५ रुग्ण बरे झाल्यामुळे सद्या १६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात ३०८ संदिग्ध रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी ७२ जण पॉझिटिव्ह असून, २३६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज दिवसभरात पॉझिटीव्ह आलेल्या अहवालात २९ महिला तर ४३ पुरुष रुग्ण आहेत. सकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १३ जण हे एकट्या हरिहर पेठ भागातील रहिवासी आहेत. मोहता मिल प्लॉट नाजुकनगर, मोठी उमरी, गुलजार पुरा येथील प्रत्येकी दोन जण, तर खैर मोहम्मद प्लॉट, राहुलनगर शिवनी, तेलीपुरा, लेबर कॉलनी तारफैल, सहकार नगर, डाबकी रोड, वृंदावन नगर, देशमुख फैल, चांदखा प्लॉट वाशिम बायपास, फिरदौस कॉलनी, रणपिसे नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये अकोट फैल येथील अकरा, रामदास पेठ येथील पाच, माळीपुरा येथील पाच, मुर्तिजापूर येथील तीन, फिरदौस कॉलनी येथील दोन, अशोक नगर येथील दोन, डाबकी रोड येथील दोन, तर उर्वरित महसूल कॉलनी, रजतपुरा, गायत्रीनगर, सिंधी कॅम्प, गर्ल्स होस्टेल आरटीएएम, शिवसेना वसाहत, देशमुख फैल, संताजीनगर, जठारपेठ, न्यू तारफैल, गुलिस्तान कॉलनी. मोमीनपुरा येथील प्रत्येकी एक जण आहे.
शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमध्ये रुग्ण सापडले असून, अकोला शहर हे विदर्भातील सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर म्हणून समोर आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५०७ जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. आतापर्यंत २८ कोरानोबाधितांचा मृत्यू (एक आत्महत्या)झाला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्याही दिलासा देणारी आहे. आतापर्यंत ३१५ रुग्ण कोरोनातून सावरले असून, त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १६४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
२६ जणांना डिस्चार्ज
आज दुपारी २६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील पाच जणांना घरी तर उर्वरित २१ जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-५०७
मयत-२८(२७+१),डिस्चार्ज-३१५
दाखल रुग्ण ( अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१६४
प्राप्त अहवाल-३०८
पॉझिटीव्ह-७२
निगेटीव्ह-२३६