शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १४२१ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 6:24 PM

शनिवार, २७ जून रोजी दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

ठळक मुद्देएकूण बाधितांची संख्या १४२१ झाली आहे. ३०० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.दिवसभरात २७० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले.

अकोला : अकोल्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराची लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवार, २७ जून रोजी दिवसभरात ५७ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १४२१ झाली आहे. आतापर्यंत एकूण १०४७ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३०० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.विदर्भातील कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी दिवसभरात २७० संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर उर्वरित २१३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त ४२ पॉझिटिव्ह अहवालात १९ महिला व २३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामध्ये हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, समर्थनगर पातूर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन, तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळी १५ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सहा महिला व नऊ पुरुष आहे. त्यातील सात जण हरिहर पेठ येथील, तिघे रजपूत पुरा येथील तर उर्वरित डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व मंगळूरपीर जि. वाशीम येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहेत.३०० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरुआजपर्यंत एकूण १४२१ पॉझिटीव्ह अहवालांची संख्या आहे. त्यातील ७४ जण (एक आत्महत्या व ७३ कोरोनामुळे) मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची संख्या १०४७ आहे. तर सद्यस्थितीत ३०० पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.प्राप्त अहवाल-२७०पॉझिटीव्ह अहवाल-५७निगेटीव्ह-२१३आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल- १४२१मयत-७४ (७३+१)डिस्चार्ज-१०४७दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३००

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला