CoronaVirus in Akola : आणखी ४० पॉझिटिव्ह; १९ जणांना डिस्चार्ज  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 07:03 PM2020-07-22T19:03:39+5:302020-07-22T19:04:02+5:30

बुधवार, २२ जुलै रोजी दिवसभरात आणखी ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

CoronaVirus in Akola: 40 more positive; Discharge of 19 persons | CoronaVirus in Akola : आणखी ४० पॉझिटिव्ह; १९ जणांना डिस्चार्ज  

CoronaVirus in Akola : आणखी ४० पॉझिटिव्ह; १९ जणांना डिस्चार्ज  

Next

अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी तीन दिवसांच्या संपूर्ण लॉकडाऊनची उपाययोजना केल्यानंतरही या संसर्गजन्य आजाराचा धुमाकुळ सुरुच असून, बुधवार, २२ जुलै रोजी दिवसभरात आणखी ४० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या २२४६ झाली आहे. दरम्यान, १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या ३४४ जणांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी ‘आरटीपीसीआर’ चाचणीचे २५७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४० पॉझिटिव्ह असून, उर्वरित २१७ निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये २४ महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये १६ जण हे पातूर येथील, तीन जण हिवरखेड येथील, बोरगांव मंजू, सातव चौक, खदान, अकोली जहाँगीर, वाडेगाव, आलेगांव येथील प्रत्येकी दोन, तर मोठी उमरी, लोकमान्य नगर, अकोट, सिंधी कॅम्प, जीएमसी वसतीगृह, खडकी, विजय नगर, न्यु भीम नगर व रामदास पेठ येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सायंकाळच्या अहवालांमध्ये एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

१९ जणांना डिस्चार्ज
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तीन जणांना, कोविड केअर सेंटर अकोला येथून एक जण, कोविड रुग्णालय मुर्तिजापूर येथून सात जणांना, आयकॉन हॉस्पिटल येथून एक जण तर हॉटेल रेजेन्सी येथून सात जणांना अशा एकूण १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली.

३४४ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण २२४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यापैकी १०५ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण १७९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत ३४४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Web Title: CoronaVirus in Akola: 40 more positive; Discharge of 19 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.