CoronaVirus in Akola : आठवडाभरात २९० रुग्ण कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 10:12 IST2020-06-28T10:12:22+5:302020-06-28T10:12:31+5:30
आठवडाभरात २९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांवर पोहोचले आहे.

CoronaVirus in Akola : आठवडाभरात २९० रुग्ण कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दिलासा देणारी आहे. आठवडाभरात २९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांवर पोहोचले आहे.
जिल्ह्यात कोरोनाने शिरकाव करून जवळपास तीन महिन्यांचा कालावधी होत आहे; मात्र एप्रिल व मेच्या तुलनेत जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच कोरोनाने जिल्ह्यात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली. रुग्णसंख्या वाढीसोबतच मृत्यूचा दरही चार वरून ५.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही बाब अकोलेकरांची चिंता वाढवणारी आहे; मात्र याच दरम्यान कोरोनावर मात करून बरे होणाऱ्यांची वाढती संख्या काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. गत आठवडाभरात २९० रुग्ण पूर्ण बरे झाले असून, आतापर्यंत १,०४७ रुग्णांना डिस्चार्ज केले आहे.
दहा टक्क्यांनी वाढले बरे होण्याचे प्रमाण
जून महिन्याच्या सुरुवारतीला कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ६४ टक्के होते; मात्र रुग्णसंख्या वाढीसोबतच कोरोनावर मात करणाºयांची संख्याही झपाट्याने वाढू लागली. आजारातून बरे होण्याचा वेग वाढल्याने काही दिवसांतच हे प्रमाण १० टक्क्यांनी वाढून ७४ टक्क्यांवर पोहोचले.