CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 19:35 IST2020-06-02T19:30:17+5:302020-06-02T19:35:59+5:30
मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली.

CoronaVirus in Akola : दिवसभरात २० कोरोनामुक्त झाले; २२ रुग्ण वाढले
अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असतानाच, मंगळवार, २ जून रोजी आणखी २० जणांना रुग्णालायातून सुटी देण्यात आली. दरम्यान, दिवसभरात आणखी २२ रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२७ झाली आहे. तथापी, यापैकी ४६२ रुग्ण बरे झाल्याने आता फक्त १३१ रुग्ण उपचारार्थ दाखल असल्याचे जिल्हा प्रशासनाने मंगळवारी स्पष्ट केले.
सोमवारी सकाळी प्राप्त ४८ पैकी २२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, तर उर्वरित २७ अहवाल निगेटिव्ह आहेत. आज सकाळी प्राप्त अहवालात १२ महिला व १० पुरुष पॉझिटीव्ह आढळले आहेत. दोन महिला रुग्ण ह्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून संदर्भित आहेत. हे रुग्ण रजपुतपुरा येथील तीन, सिंधी कॅम्प येथिल दोन, माळीपुरा येथील दोन, अशोकनगर अकोट फैल येथील दोन तर उर्वरीत तारफैल, सिटी कोतवाली, जठारपेठ, आंबेडकरनगर, शिवसेना वसाहत, जुने तारफैल, आदर्श कॉलनी, गुलशन कॉलनी, रुद्रनगर, जुनी उमरी नाका, खदान, पुरानी मशिद आणि अलिम चौक खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सायंकाळी केवळ एकच निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाला. आतापर्यंत ४६२ रुग्ण बरे झाल्याने सद्यस्थितीत १३१ रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी दिली.
सोमवारी २० जणांना डिस्चार्ज
आज दुपारी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यात सात महिला व १३ पुरुष आहेत. त्यातील १३ जणांना घरी सोडण्यात आले. तर उर्वरित सात जणांना संस्थागत अलगीकरणात निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यातील तिन जण रामदास पेठ येथिल, तीन जण अकोट फैल येथील, दोन जण पातूर येथिल, दोन जण सिटी कोतवाली येथील, तर अन्य गोरक्षण रोड, मलकापूर, मोहता मिल, गुलजार पुरा, आगरवेस, फिरदौस कॉलनी, शिवर, रजपुतपुरा, तारफैल, कमलानगर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-६२७
मयत-३४(३३+१),डिस्चार्ज-४६२
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-१३१