शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

CoronaVirus in Akola : दिवसभरात १८६ कोरोनामुक्त; एकाचा बळी; २५ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 18:28 IST

CoronaVirus in Akola १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला असला, तरी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे सत्र सुरुच आहे. रविवार, ४ आॅक्टाबर रोजी अकोला शहरातील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २४४ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ७,६२० वर गेली आहे. दरम्यान, १८६ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यांचे १८९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १६४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये हिंगणा फाटा येथील चार जणांसह डाबकी रोड येथील दोन, पारडी, बार्शीटाकळी, जवाहर नगर, मोठी उमरी, जीएमसी , गीरीनगर, मलकापूर व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी अकोट व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी तीन, मूर्तिजापूर, जीएमसी, आदर्श कॉलनी, दानापूर ता. अकोट व पाथर्डी ता. तेल्हारा येथील प्रत्येकी एक रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.५० वर्षीय पुरुषाचा मृत्यूरविवारी आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. हा रुग्ण बस स्टँड, अकोला येथील ५० वर्षीय पुरुष असून, त्यांना १ आॅक्टोबर रोजी उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.१८६ जणांना डिस्चार्जरविवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४४, कोविड केअर सेंटर अकोला येथून नऊ, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाचा, युनिक हॉस्पिटल येथून एक, अवधाते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक, अकोला अक्सिडेंट क्लीनिक येथून तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथून एका, आयुर्वेदिक महाविद्यालय येथून तीन, हॉटेल स्कायलार्क येथून नऊ, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी येथून तीन, कोविड केअर सेंटर हेन्डज मूर्तिजापूर येथून ११ तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले ९६ अशा एकूण १८६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.८६० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,६२० जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६५१६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २४४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ८६० अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला