शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

CoronaVirus in Akola : आणखी १५ रुग्ण वाढले; एकूण रुग्णसंख्या ११७८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 12:20 PM

रविवार, २२ जून रोजी आणखी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ११७८ झाली आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होण्याची कोणतीही चिन्हे नसून, रविवार, २२ जून रोजी आणखी १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ११७८ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ७५२ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३६२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.कोरोनाचा हॉटस्पॉट अशी ओळख झालेल्या अकोल्यात दररोज मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी सकाळी एकूण १३५ संदिग्ध रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. तर उर्वरित १२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये पाच महिला व दहा पुरुष आहेत. यामध्ये शंकर नगर व गुलजारपूरा येथील प्रत्येकी तीन, अकोट फाईल येथील दोन, तर गीतानगर, सिंधी कॅम्प अकोट, साबरीपुरा इंदिरानगर, वाशिम बायपास, वृंदावन नगर, नाना उजवणे प्रतिष्ठान जवळ, लाडीस फाईल येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. यातील १३ अहवाल अकोट फाईल येथील मनपा स्वॅब संकलन केन्द्रावरील असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत ६४ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, यामध्ये एका कोरोनाबाधिताच्या आत्महत्येचा समावेश आहे.प्राप्त अहवाल- १३५पॉझिटीव्ह- १५निगेटीव्ह-१२०

आता सद्यस्थितीएकूण पॉझिटिव्ह अहवाल- ११७८मयत-६४(६३+१), डिस्चार्ज-७५२दाखल रुग्ण (अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३६२

 

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या