अकोला : अकोल्यात स्थिरावलेल्या कोरोना विषाणूने आता आपला विळखा घट्ट करण्यास सुरुवात केली असून, कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवार, ५ मे रोजी आणखी ११ जणांची भर पडली असून, या अकरा जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहम्मद अली रोड भागातील, तर उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर,खंगनपुरा, कृषी नगर,ताजनगर येथील रहिवासी असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे आता कोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने एकून रुग्णांची संख्या ७५ झाली आहे. तर सद्यस्थितीत ५५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत.
CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; एकून रुग्णसंख्या ७५ वर; अॅक्टिव्ह रुग्ण ५५
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 10:46 IST
५ मे रोजी आणखी ११ जणांची भर पडली असून, या अकरा जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सकाळी दिली.
CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; एकून रुग्णसंख्या ७५ वर; अॅक्टिव्ह रुग्ण ५५
ठळक मुद्देपॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चार जण मोहम्मद अली रोड भागातील.उर्वरित पैकी दोन जण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, पिंजर,खंगनपुरा, कृषी नगर,ताजनगर येथीलकोरोनाचे रुग्ण ग्रामीण भागातही आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे.