CoronaVirus: आणखी १०६ जणांची कोरोनावर मात; १५ नवे रुग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 12:42 PM2020-10-02T12:42:08+5:302020-10-02T12:42:33+5:30

CoronaVirus News, Akola एकूण रुग्णसंख्या ७५६४ वर गेली आहे.

CoronaVirus In Akola 106 more overcome corona; 15 new patients were found | CoronaVirus: आणखी १०६ जणांची कोरोनावर मात; १५ नवे रुग्ण आढळले

CoronaVirus: आणखी १०६ जणांची कोरोनावर मात; १५ नवे रुग्ण आढळले

Next


अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असून, शुक्रवार, २ आॅक्टाबर रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे एकूण रुग्णसंख्या ७५६४ वर गेली आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री आणखी १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी सकाळी आरटीपीसीआर चाचण्यांचे २७८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १५ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २६३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये सात महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये जठारपेठ व डोंगरगाव येथील प्रत्येकी तीन जणांसह संतोष नगर येथील दोन, कौलखेड, मलकापूर, लक्ष्मी नगर, भागवतवाडी, मुरारका मेडिकल, देशमुख फाईल, वाडेगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.

१०६ जणांना डिस्चार्ज
गुरुवारी रात्री अकोला अ‍ॅक्सीडेंट क्लिनीक येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून पाच आणि होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झालेले १०० अशा एकूण १०६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


१,१८४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७,५६४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ६१४१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २३९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,१८४ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.

Web Title: CoronaVirus In Akola 106 more overcome corona; 15 new patients were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app