CoronaVirus : पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 14:46 IST2020-03-21T14:46:12+5:302020-03-21T14:46:41+5:30

पाळीव प्राणी जसे कुत्रा, मांजर, कोंबड्या इ.च्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावतो.

CoronaVirus: Action for if pets released | CoronaVirus : पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई

CoronaVirus : पाळीव प्राण्यांना मोकाट सोडल्यास कारवाई

अकोला: कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर पाळीव प्राण्यांना मोकळे सोडून दिल्याच्या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे, असे पाळीव प्राण्यांच्या पालकाने केल्यास हे कृत्य प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचे समजले जाऊन प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० नुसार कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून प्राप्त झाले आहेत.
पाळीव प्राणी जसे कुत्रा, मांजर, कोंबड्या इ.च्यामार्फत कोरोना विषाणूचा संसर्ग फैलावतो. हा गैरसमज असून, या प्राण्यांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याचे कोणतेही शास्त्रीय पुरावे नाहीत. त्यामुळे या प्राण्यांचे पालकत्व पत्करलेल्या लोकांनी घाबरून आपल्याकडील पाळीव प्राण्यास सोडून देऊ नये, त्यामुळे प्राण्यांची उपासमार होऊ शकते. उपासमारीमुळे अथवा आजारामुळे वा अपघातामुळे त्यांना अपंगत्व अथवा मृत्यूस कारणीभूत ठरणार नाही, याबाबत आवश्यक दक्षता घ्यावी, याबाबत अफवा पसरणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी, असे झाल्यास प्राण्यांना क्रू रतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० नुसार कारवाई करण्यात येईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.

 

Web Title: CoronaVirus: Action for if pets released