CoronaVirus; 36 new corona positive; Total number of patients 2791 | CoronaVirus; ३६ नवे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७९१

CoronaVirus; ३६ नवे कोरोना पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या २७९१

अकोला : गत चार महिन्यांपासून जिल्ह्यात धुमाकुळ घालत असलेल्या कोरोनाचा कहर सुरुच असून, रुग्णवाढीचे सत्र थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. बुधवार, ५ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात ३२ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या २७९१ झाली आहे. सद्यस्थितीत ४३५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पश्चिम विदर्भात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून अकोल्याची कुप्रसिद्धी झाली आहे. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही अकोल्यात जास्त आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी सकाळी आरटीपीसीआर’ चाचणीचे १८४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ३६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १४८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. पॉझिव्हि ३६ अहवालांमध्ये २० महिला व १६ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये दाळंबी गावातील नऊ जणांसह, मोठी उमरीतील विठ्ठल नगर भागातील पाच, बोरगाव मंजू व वाडेगाव येथील प्रत्येकी तीन, अकोट, डाबकी रोड व आगर येथील प्रत्येकी दोन, मुर्तिजापूर, संताजी नगर, बार्शीटाकळी, रिधोरा, दहिहांडा, शिवर, संकल्प कॉलनी, कोठारी, केशव नगर व अग्रसेन भवन येथील प्रत्येकी एकाचा समावेश असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

४३५ जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७९१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २२४३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ११३ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४३५ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

प्राप्त अहवाल- १८४
पॉझिटीव्ह- ३६
निगेटीव्ह- १४८


आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटीव्ह अहवाल- २३७५+४१६=२७९१
मयत-११३
डिस्चार्ज- २२४३
दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह- ४३५  

Web Title: CoronaVirus; 36 new corona positive; Total number of patients 2791

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.