अकोटात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST2020-12-17T04:43:39+5:302020-12-17T04:43:39+5:30

शिवछत्रपती साम्राज्य ग्रुपचे संतोषकुमार खवले निर्मित हा लघुचित्रपट दीपक गोरे यांनी दिग्दर्शित केला. हम है कोविड योद्धा हा लघु ...

Corona Warrior Award distribution in Akota | अकोटात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण

अकोटात कोरोना योद्धा पुरस्कार वितरण

शिवछत्रपती साम्राज्य ग्रुपचे संतोषकुमार खवले निर्मित हा लघुचित्रपट दीपक गोरे यांनी दिग्दर्शित केला. हम है कोविड योद्धा हा लघु चित्रपट सत्याविजय टॉकीज येथे रविवारी मोफत दाखविण्यात आला. यावेळी कोरोनाकाळात समाजसेवा करणाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करीत प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयकुमार झुनझुनवाला तर प्रमुख अतिथी म्हणून तेल्हारा प्रभारी तहसीलदार राजेश गुरव, अकोट ग्रामीणचे ठाणेदार ज्ञानोबा फड, पीएसआय अनुराधा पाटेखेडे, नायब तहसीलदार हरीश गुरव, पत्रकार विजय शिंदे, चंचल पितांबरवाले, प्रा. माया कोरपे, दीपक गोरे, नरेंद्र काकड, अचल बेलसरे, विशाल भगत, राजीव खारोडे उपस्थित होते. चित्रफितीमध्ये जनजागृती करणारे कलाकार आशिष भटकर, आदित्य पाटील, सुमती इंगळे, राजेश पाटील, समृद्धी इंगळे, संतोष झामरे, विष्णू झामरे, आसावरी पाटील उपस्थित होते. आभार संतोषकुमार खवले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. प्रवीण बोंद्रे, अमेरुन शहा, निकिता काशिदे, तुषार नवलकर, मिलिंद झामरे, नितीन चिंचोलकर, रवी शिंदे यांनी परिश्रम घेतले.

फोटो:

Web Title: Corona Warrior Award distribution in Akota