शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus in Akola : चौघांचा मृत्यू, ४८ नवे पॉझिटिव्ह, ३३ जण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 19:32 IST

शनिवार, ४ जुलै रोजी आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

ठळक मुद्दे ४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८८ झाला आहे. शनिवारी ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

अकोला : अकोला शहर व जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे. शनिवार, ४ जुलै रोजी आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ४८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा ८८ झाला आहे. तर एकूण रुग्ण संख्या १६६५ वर गेली आहे. दरम्यान, शनिवारी ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.विदर्भात नागपूरनंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांचे शहर अशी ओळख झालेल्या अकोल्यात रुग्णांचा व कोरोनाच्या बळींचा आकडा दररोज वाढत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी सकाळी एकूण ३५४ जणांचे वैद्यकीय चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. तर ३०६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह ४८ अहवालांमध्ये  १५ महिला व ३३ पुरुष आहेत. त्यातील १४ जण पातूर येथील, १२ जण बाळापूर येथील, अकोट येथील पाच जण, खोलेश्वर येथील चार जण, लहान उमरी,  डाबकी रोड व जीएमसी होस्टेल येथील प्रत्येकी दोन जण तर बार्शीटाकळी, गिरीनगर, गंगानगर, अकोट फैल, वाशीम बायपास, आदर्श कॉलनी व वाशीम येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.चौघांचा मृत्यूकोरोनामुळे शनिवारी चौघांंच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी  महान बार्शीटाकळी येथील २४ वर्षीय महिला, व अकोला शहरातील खैर मोहम्मद प्लॉट भागातील ७२ वर्षीय पुरुषाचा शनिवारी मृत्यू झाला. तर बाळापूर येथील ३६ वर्षीय पुरुष व अकोट येथील ७२ वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. ३३ जण कोरोनामुक्तशनिवारी दिवसभरात    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चार तर कोविड केअर सेंटर मधून २९ अशा एकूण ३३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे  श्रीवास्तव चौक, शिवाजीनगर, हरिहर पेठ व पारस येथील रहिवासी आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून कळविण्यात आले. तर कोविड केअर सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण हे सहा जण आंबेडकर नगर येथील, पाच जण अकोट फैल येथील,  जुने शहर, अशोक नगर व राधाकिसन प्लॉट येथील प्रत्येकी तीन जण, हरिहर पेठ येथील दोन जण तर  कौलखेड, दगडीपुल, सिंधी कॅम्प,  बसेरानगर, अकोट, हिंगणा, भिमनगर येथील रहिवासी आहेत,असे कोविड केअर सेंटर मधून कळविण्यात आले आहे .सद्यस्थितीत ३२२ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. आता सद्यस्थितीएकूण पॉझिटीव्ह अहवाल-१६६५मयत-८८(८७+१)डिस्चार्ज १२५५दाखल रुग्ण (अ‍ॅक्टीव्ह पॉझिटीव्ह)-३२२

 

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या