शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : लसीकरण मोहिमेचा वेग वाढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 10:49 IST

Corona Vaccine: प्राथमिक आरोग्य केंद्रांतही (पीएचसी) लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने मोहिमेला पुन्हा गती मिळणार आहे.

अकोला : मध्यंतरी लसीच्या तुटवड्यामुळे ग्रामीण भागातील बहुतांश केंद्रे बंद होती. शहरातील मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू होते. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली होती. मात्र, आता ग्रामीण रुग्णालयांसोबतच प्राथमिक आरोग्य केंद्रांतही (पीएचसी) लसीकरणाला सुरुवात होणार असल्याने मोहिमेला पुन्हा गती मिळणार आहे. कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात होऊन सुमारे सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र, आतापर्यंत एकूण उद्दिष्टाच्या केवळ २२ ते २३ टक्केच लसीकरण पूर्ण होऊ शकले आहे. मध्यंतरी लसीचा तुटवडा, तर कधी नागरिकांची उदासीनता या कारणांमुळे लसीकरणाचा वेगही कमी असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये सर्वांत मोठा आणि उत्सुक असलेल्या युवावर्गाला मात्र लसीकरणाच्या प्रतीक्षेतच राहावे लागले. आता सोमवार, दि.२१ जूनपासून ३० वर्षांवरील सर्वांनाच लस मिळणार आहे. त्या अनुषंगाने लसीकरण केंद्रांमध्येही वाढ केली जात आहे. महापालिका क्षेत्रासह ग्रामीण रुग्णालयांमध्येही लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे अकोला शहरासह ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्याच्या शेवटी जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्येही कोविड लसीकरण मोहिमेला सुरुवात केली जाणार असल्याने ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढणार आहे. यासाठी लागणारा लसीचा मुबलक साठाही जिल्ह्यात उपलब्ध आहे. त्यामुळे यंदा लसीचा तुटवडा भासण्याची शक्यता कमी असल्याने जिल्ह्यात लसीकरणाचा वेग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

अशी असतील केंद्रे

महापालिका क्षेत्र - १०

ग्रामीण रुग्णालय - ०५

पीएचसी - ३१

 

कोविशिल्ड लसीला प्राधान्य

कोविड लसीरण मोहिमेंतर्गत कोव्हॅक्सिनऐवजी कोविशिल्डला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प हाेत असल्याने दुसऱ्या डोससाठी मोठी अडचण निर्माण होते. दोन्ही डोसमधील अंतर वाढू नये, तसेच नागरिकांना अडचणीचे जाऊ नये, या अनुषंगाने कोविशिल्ड लसीला प्राधान्य दिले जाणार असल्याची माहिती आहे. कोविशिल्ड लसीचा दर आठवड्यात पुरवठा होत असल्याने तुटवडाही भासणार नसल्याचे आरोग्य यंत्रणेमार्फत सांगण्यात येत आहे.

 

लसीकरणाविषयी जनजागृतीची गरज

मागील काही दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी उदासीनता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. ही गती वाढविण्यासाठी ४५ वर्षांवरील नागरिकांमध्ये कोविड लसीकरणाच्या फायद्यांविषयी जनजागृती करण्याची गरज आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसAkolaअकोला