शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Vaccine : विदर्भात दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 10:18 IST

Corona Vaccine: लसीचा पुरेसा पुरवठा न झाल्याने अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दुसऱ्या डोसचे लसीकरण संथगतीने होऊ लागले.

ठळक मुद्देनागपुरात सर्वाधिक लसीकरण अकोल्यात केवळ २४ टक्के लसीकरण

अकोला: कोविड लसीकरणाला सुरुवात झाल्याच्या काही दिवसांनंतरच अकोल्यासह विदर्भात कोविडच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली होती. कोरोनाचा धाेका वाढत असताना लसीकरणाचा वेग वाढविणे गरजेचे होते. मात्र, लसीचा पुरेसा पुरवठा न झाल्याने अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांत दुसऱ्या डोसचे लसीकरण संथगतीने होऊ लागले. कोविन डॅशबोेर्डनुसार, विदर्भात आतापर्यंत सर्वाधिक लसीकरण नागपूर जिल्ह्यात झाले आहे, तर अकोल्यात केवळ २४ टक्के लसीकरण झाले आहे. अकोल्यासह राज्यात १६ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली. पहिल्या डोसचे लसीकरण वेगाने झाले. मात्र, गरजेनुसार लसीचा पुरवठा न झाल्याने लसीकरणाचा वेग मंदावला. मार्च, एप्रिल महिन्यांत ज्येष्ठ नागरिकांसोबतच ४५ वर्षांवरील लाभार्थींच्या लसीकरणाला वेग आला. त्यामुळे अकोल्यासह विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले. असे असले तरी अनेकांना लसीकरणाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पहिला डोस घेतला, तरी लसीअभावी दुसरा डोस मिळणे कठीण झाले. विदर्भात नागपूर, अमरावती, बलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांत सर्वाधिक लसीकरण झाले असले, तरी दुसऱ्या डोसचे लसीकरण संथ गतीने सुरू आहे.

लोकांमध्ये उत्सुकता, मात्र लस मिळेना

लोकांमध्ये लसीची उत्सुकता असली, तरी विदर्भातील अकराही जिल्ह्यांना गरजेनुसार लस उपलब्ध होत नसल्याने लसीकरणाची गती मंदावली आहे. लस उपलब्ध झाली, तरी मोजक्याच केंद्रांवर लसीकरण सुरू असल्याने लाभार्थींना लस मिळणे कठीण झाले आहे.

 

तरुणाईला प्रतीक्षा २१ जूनची

राज्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटातील लाभार्थींचे लसीकरण ठप्प पडले आहे. दरम्यान, २१ जूनपासून या गटातील लसीकरणास सुरुवात होणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे तरुणाई २१ जूनची प्रतीक्षा करीत आहे.

जिल्हानिहाय लसीकरण (कोविन डॅशबोर्डनुसार)

जिल्हा - झालेले एकूण लसीकरण

अकोला - ३, ३५,४०६

नागपूर - १३,३५,१५४

अमरावती - ५२२, ७५०

बुलडाणा - ४,७०,९५१

यवतमाळ - ४,६१,६४८

वाशिम - २,६६,७६२

भंडारा - ३, ०५,७५८

वर्धा - ३,०४, ६२८

गोंदिया - ३,११,९२४

गडचिरोली - १,७८, ३४४

चंद्रपूर - ४,०४,५५४

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसVidarbhaविदर्भAkolaअकोलाnagpurनागपूर