Corona: Two suspected patients in Telhara taluka Akola 'Refer | कोरोना : तेल्हारा तालुक्यातील दोन संदिग्ध रुग्ण अकोल्याला ‘रेफर

कोरोना : तेल्हारा तालुक्यातील दोन संदिग्ध रुग्ण अकोल्याला ‘रेफर

प्रशांत विखे

तेल्हारा : दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांच्या संपर्कात आलेल्या तेल्हारा तालुक्यातील दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी शनिवारी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नसला, तरी दिवसेंदिवस संदिग्ध रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पृष्ठभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या शेकडो जणांना कोरोना विषाणूची लागन झाली आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही व्यक्ती अकोला जिल्ह्यातही परत आल्या आहेत. या पृष्ठभूमीवर तेल्हारा पोलिसांनी शनिवारी तालुक्यातील दोघांना ताब्यात घेऊन त्यांची प्राथमिक आरोग्य केंद्रावर तपासणी करण्यात आली. त्यानंतर पुढील कोरोना चाचणीसाठी या दोघांनाही अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील जनतेने घाबरून न जाता स्वत: ची काळजी घेऊन विनाकारण घराबाहेर पडू नये असे आव्हान प्रशासन कडून करण्यात आले आहे

 

Web Title: Corona: Two suspected patients in Telhara taluka Akola 'Refer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.