शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

कोरोनाने अख्खं कुटूंबच केलं उद्ध्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2021 4:20 AM

पत्नी, मुलगी पाठोपाठ समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. प्रा. मुकुंद खैरे (६३) यांचे ...

पत्नी, मुलगी पाठोपाठ समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ॲड. प्रा. मुकुंद खैरे (६३) यांचे बुधवारी सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले.

प्रा. मुकुंद खैरे हे अनेक दिवसांपासून कोरोना आजाराशी लढा देत होते. त्यांच्या पत्नी व मुलीलाही कोरोनाची लागण झाली होती. गत आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर ५ मे रोजी उपचारादरम्यान मुकुंद खैरे यांचे निधन झाले. त्यांनी येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य करीत असतानाच समाज क्रांती आघाडी या सामाजिक संस्थेची चैत्यभूमी मुंबई येथे ६ डिसेंबर १९९१ रोजी स्थापना केली. ही संघटना पुढे नेत, त्यांनी संघटनेचे देशभर जाळे विणले. राज्यघटनेचे ते गाढे अभ्यासक होते. त्यांनी अनेक आंदोलने करून शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला.

बुद्धगया मुक्ती आंदोलन, संविधान बचाव, राजकारणाला भ्रष्टाचारातून मुक्तीचे आंदोलन, दसरा छोडो, २४ ऑक्टोबर का स्वीकार करो, भूमिहीनांचे प्रश्न, आरोग्याच्या अधिकारासाठी सातत्याने ते झटले.

१० वर्षांपूर्वी त्यांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढविली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनुसार त्यांनी वाटचाल करीत, बहुजन समाजासाठी कार्य केले. आठ दिवसांपूर्वी पत्नी छायाताई खैरे, शताब्दी मुलगी कोरोनाने यांचे निधन झाले. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात त्यांनी स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली. त्यांच्या अकाली निधनाने मूर्तिजापूर तालुक्यात शोककळा पसरली.

धाकट्या मुलीवर आईवडील, बहिणीच्या अंत्यसंस्काराची वेळ

प्रा. मुकुंद खैरे यांचे कुटुंब म्हणजे पत्नी छाया आणि अर्चना, शताब्दी आणि श्वेता अशा तीन मुली. वैचारिक आणि सामाजिक अधिष्ठान लाभलेले हे मूर्तिजापुरातील अतिशय आनंदी असे सुंदर कुटुंब. त्यांचे कारंजा रोडवरील घर मूर्तिजापूरसह जिल्ह्यातील आणि चळवळीतील अनेकांसाठी मदत मिळण्याचे हक्काचे केंद्र होते. २००४ ला प्रा. मुकुंद खैरे यांची माेठी मुलगी अर्चना हिचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या अपघातातून खैरे आणि लहान मुलगी बचावले. आता अवघ्या पंधरा दिवसात या कुटुंबातील तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला. १९ एप्रिलला प्रा. खैरे यांच्या पत्नी छाया यांचे अकोल्यात कोरोनावर उपचारादरम्यान निधन झाले. तर २ मे रोजी त्यांची ३२ वर्षीय वकील असलेली मुलगी शताब्दी यांचे निधन झाले. शताब्दी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात पाच वर्षांपासून वकिली करीत होत्या. आज सकाळी प्रा. खैरे यांचाही कोरोनाने मृत्यू झाला. तब्बल वीस दिवसांपासून त्यांचा रुग्णालयात कोरोनाशी संघर्ष सुरू होता. प्रा. खैरे यांची सर्वात लहान मुलगी श्वेता हिच्यावर अवघ्या पंधरा दिवसांत आई, बहीण आणि वडील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे.

फोटो :