शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात कोरोनाचा प्रकोप; एकाच दिवशी २० ‘पॉझिटिव्ह’

By रवी दामोदर | Updated: April 4, 2023 16:57 IST

कोरोना संसर्ग तपासणीचे ६४ अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

अकोला: गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल २० पॉझिटिव्ह आढळून आल्याने अकोलेकरांचे टेन्शन वाढले आहे. ऐन लग्नसराई, सणासुदीच्या काळात कोरोना पसरत असल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे शहराच्या ठिकाणी फैलाव होत असलेल्या कोरोनाने आता ग्रामीण भागात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. २० पॉझिटिव्ह रुग्णांपैकी १६ रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.

कोरोना संसर्ग तपासणीचे ६४ अहवाल प्राप्त झाले असून, त्यामध्ये २० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामध्ये १२ पूरूष तर ८ महिलांचा समावेश आहे. वातावरणात होत असलेल्या बदलाचा फटका आरोग्याला बसू लागला आहे. घरोघरी सर्दी, खोकला अन् तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, व्हायरलसोबतच कोविडचेही रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. एकाच दिवसात कोविडचे २० रुग्ण आढळून आले आहे. कोविडचा संभाव्य धोका लक्षात घेता वेळीच संदिग्ध रुग्णांच्या कोविड चाचण्या करण्याची गरज आहे. मात्र, तसे होताना दिसून येत नाही.असे आढळले रुग्ण

मंगळवारी २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, त्यामध्ये ग्रामीण भागातील रुग्ण वाढले आहेत. त्यात बाळापूर येथील दोन, मुर्तिजापूर येथील ११, अकोला ग्रामीण येथील तीन व अकोला महानगपालिका क्षेत्रातील चार रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

५ कोरोनामुक्त, सक्रिय रुग्ण ३८ वर

कोरोनावर मात केलेल्या पाच रुग्णास मंगळवारी  डिस्चार्ज देण्यात आला असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ३८ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सहा रुग्ण रुग्णालयात दाखल असून, उर्वरीत ३२ जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAkolaअकोला