दिनोडा येथे कोरोना तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:20 IST2021-05-20T04:20:00+5:302021-05-20T04:20:00+5:30

मनात्री येथे भरला आठवडी बाजार मनात्री खुर्द : तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे बुधवारी आठवडी बाजार भरला. बाजारात नियमांचे उल्लंघन ...

Corona inspection camp at Dinoda | दिनोडा येथे कोरोना तपासणी शिबिर

दिनोडा येथे कोरोना तपासणी शिबिर

मनात्री येथे भरला आठवडी बाजार

मनात्री खुर्द : तेल्हारा तालुक्यातील मनात्री येथे बुधवारी आठवडी बाजार भरला. बाजारात नियमांचे उल्लंघन होत आहे. कोराेनामुळे आठवडी बाजार बंद ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश असतानाही बुधवारी मनात्री येथे बाजार भरला. बाजारात गर्दी होती. यावेळी नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आले.

फोटो:

भाजीपाल्याची दामदुपटीने विक्री

मनात्री: भाजीपाला विक्रेते लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत आहेत. बाजारात बुधवारी भाजीपाला दामदुपटीने विक्री करण्यात आला. एकीकडे शेतकऱ्यांकडून स्वस्तात भाजीपाला खरेदी करून नागरिकांनी दुप्पट दराने विक्री करण्यात येत आहे. लॉकडाऊनचे कारण पुढे करून भाजी विक्रेते चढ्या दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत.

कवठा परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

कवठा: कवठा व निंबा परिसरात मंगळवारी रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यामुळे विजेच्या तारा लोंबकळल्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा पाच ते सहा तास बंद झाला होता. वादळी वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली. अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेली.

Web Title: Corona inspection camp at Dinoda