चायनिज खवय्यांमध्ये कोरोनाची भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 02:26 PM2020-03-16T14:26:08+5:302020-03-16T14:26:13+5:30

शहरात चायनिज विक्री करणाºयांकडील गर्दी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत आले आहे.

Corona fears Chinese fast food | चायनिज खवय्यांमध्ये कोरोनाची भीती!

चायनिज खवय्यांमध्ये कोरोनाची भीती!

Next

- सचिन राऊत

अकोला : कोरोनाचा धसका आता चायनिज खाद्यपदार्थ खाणाऱ्यांनीही घेतला आहे. शहरात चायनिज विक्री करणाºयांकडील गर्दी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे वास्तव लोकमतच्या पाहणीत आले आहे.
कोरोना व्हायरसची सध्या सर्वत्र दहशत निर्माण झाली आहे. चायनिज पदार्थांकडेही खवय्यांचा ओढा कमी झालेला आहे. चायनिज पदार्थ खाणाºयांमध्ये कोरोनाची भीती असल्याने ४० टक्क्याने ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. सध्या चिनी माल आणि चायनिज पदार्थ विक्रीवर होणाºया लाखो रुपयांच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जिभेचे चोचले पुरविण्यासाठी प्रत्येक जण चायनिज सेंटर गाठतो. चायजिन खाणाºयांची संख्या वाढल्याने प्रत्येक शहरात चायनिज पदार्थ विक्रीच्या माध्यमातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होते; परंतु चायनिज पदार्थांच्या या विक्रीला कोरोना विषाणूमुळे मोठा फटका बसला आहे. सतत गजबजणारी चौपाटी कोरोनाच्या भीतीमुळे शांत झाली आहे. कोरोना व्हायरसची दहशत पसरल्यापासून चायनिज पदार्थ खाणाºया ग्राहकांची संख्या ४० टक्क्याने कमी झाली आहे. चायनिज पदार्थ खाल्ल्याने त्यांनाही कोरोना व्हायरसची लागण होईल, या भीतीने काही दिवस चायनिज न खाल्लेलेच बरे, अशी सावधगिरीची भूमिका ग्राहक आता बाळगत आहेत. हॉटेल्समध्येही चायनिज मागणाºयांची संख्या कमी झाल्याचे एका विक्रेत्याने सांगितले.
 
चायनिज पदार्थांमधील हे खाद्य येते चीनमधून?
चीनमध्ये तयार होणारी चिली बिन पेस्ट आणि तिथून येणारे काही मसाले तुम्ही चायनिजमध्ये वापरता का, असे अनेक प्रश्न ग्राहक चायनिज सेंटर चालकांना विचारत आहेत. या खाद्यपदार्थांसाठी कच्चा माल हा चीनमधूनच येत असल्याची माहिती आहे.
 
चायनिज पदार्थांकडे पाहिले जाते संशयाने
चायनिज पदार्थामध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यांसारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. चायनिजच्या प्रत्येक पदार्थामध्ये सॉस असतो. नेमका हा सॉस चीनमधून येतो की इतर कोठून, असा प्रश्न ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळे सध्या कोरोनाच्या भीतीमुळे चायजिन पदार्थांकडे ग्राहक संशयाने बघत आहेत.
 
चायनिज सेंटरवर मिळणारे नुडल्स, वेगवेगळे राईस, सोया चिली, मन्चुरियन, ड्रॅगन फुट्स अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सॉस हा महत्त्वाचा घटक असतो; परंतु अकोल्यामध्ये जळगाव खान्देशमधून सॉस आणला जात असल्याची माहिती एका विक्रेत्याने दिली. चायनिज सेंटरवर तयार होणारे पदार्थ हे येथेच तयार केले जातात, त्यामुळे त्याची भीती बाळगण्याचे काही कारण नाही.

 

Web Title: Corona fears Chinese fast food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.