शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाचा धसका : शहरे वगळून ग्रामीण भागात शाळा सुरूच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 14:39 IST

ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले.

अकोला : कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश आरोग्य विभागाने दिला. त्यानुसार तालुका स्तरापर्यंतच्या शहरातीलच शाळा बंद ठेवल्या जातील, असे निर्देश राज्याच्या शिक्षण विभागाने दिले. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळा सुरूच राहणार आहेत, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांनी सांगितले. शहरांमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळा सुरू ठेवण्याबाबत संभ्रम आहे. त्यावर उद्या रविवारपर्यंत स्पष्टीकरण येण्याची शक्यता आहे.कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहेत. सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. तसे पत्र आरोग्य विभागाने शालेय शिक्षण विभागाला दिले. त्यामध्ये महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्या पत्रात ग्रामीण भागाचा उल्लेख नाही. जिल्हा परिषदेच्या शाळा मुख्यत्वे ग्रामीण भागातच आहेत. त्याबाबत पत्रात उल्लेख नसल्याने शाळा सुरूच राहतील, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी ठग यांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या अकोला, अकोट, मूर्तिजापूर, बाळापूर या शहरांतही शाळा आहेत. त्या शाळा सुरू ठेवाव्या की बंद, याबाबत शिक्षण विभाग संभ्रमात आहे. उद्या रविवारपर्यंत त्याबाबत स्पष्टीकरण येईल, असेही ठग यांनी सांगितले. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आल्या आहेत; मात्र यादरम्यान दहावीची परीक्षा सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, पुणे आणि नागपूर या सहा ठिकाणचे जिम, स्विमिंग पूल, सिनेमा थिएटर ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतला आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाAkolaअकोला