धानोरा गावापासून कोरोना लांबच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:20 AM2021-05-26T04:20:09+5:302021-05-26T04:20:09+5:30

गेल्या मार्च २०२० पासून ते २५ मेपर्यंत गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती माजी सैनिक अनिल माणिकराव ...

Corona is far from Dhanora village! | धानोरा गावापासून कोरोना लांबच!

धानोरा गावापासून कोरोना लांबच!

Next

गेल्या मार्च २०२० पासून ते २५ मेपर्यंत गावात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याची माहिती माजी सैनिक अनिल माणिकराव इंगळे यांनी दिली आहे. धानोरा गावात एकूण २६ कुटुंबे वास्तव्य करीत आहेत. जवळपास गावात २५० ते ३०० लोकवस्ती आहे. तसेच शेतकरी, शेतमजूर, नोकरदार यांचा समावेश आहे. सदर गाव पारस, बोराळा, बोर वाकडी रस्त्याला जोडलेले आहे. सदर धानोरा बोराळा परिसरातील शेतकऱ्यांना धानोरा गावातूनच शेतामध्ये मशागतीसाठी जावे लागते. असे असतानासुद्धा ग्रामस्थांनी नियमांचे पालन करून गावात कोरोनाचा प्रवेशच होऊ दिला नाही. त्यामुळे संपूर्ण देश कोरोनाविरोधात लढा देत असताना, धानोरा गाव मात्र कोरोनापासून लांब आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून गावात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.

फोटो:

यामुळे मिळाला नाही काेरोना प्रवेश!

गावातील नागरिक कोरोना विषाणू रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर, फिजिकल डिस्टन्सिंग, नियमित सॅनटायझरचा वापर वापर करीत आहेत. एवढेच नाहीतर गावातील लोक बाहेरगावी, लग्नकार्य, आठवडी बाजारात जाणे टाळत आहेत. अत्यावशक असेल तरच गावातील लोक बाहेर पडतात. गावातील ग्रामस्थ इतर गावांतील लोकांनाही गावात येण्यास मनाई करीत आहेत. गावात येणाऱ्यांची चौकशी करूनच प्रवेश देण्यात येत आहे. धानोरा गावातील गट ग्रामपंचायत असलेल्या जोगलखेडचे सरपंच अतुल दांडगे यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले आहे.

Web Title: Corona is far from Dhanora village!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.