शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

Corona Efect : महाविद्यालये बंद; परीक्षेबद्दल निर्णय नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 12:01 PM

महाविद्यालय १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने परीक्षादेखील लांबणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे.

अकोला : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालये ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली होती; परंतु बंदचा हा कार्यकाळ आता १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आला आहे. विद्यापीठांतर्गत घेण्यात येणाऱ्या महाविद्यालयीनपरीक्षांचे नियोजन १५ एप्रिलपासून होते; परंतु महाविद्यालय १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने परीक्षादेखील लांबणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये शंका आहे. विद्यापीठाने अद्याप परीक्षेबद्दल नव्याने निर्णय घेतला नाही.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित सर्वच महाविद्यालये १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार असले, तरी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक, संशोधक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहून घरूनच संबंधित विभागाचे कामकाज करावे लागणार आहे. अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजासाठी संबंधित शिक्षक, संशोधक, अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाºयांना वरिष्ठांच्या सूचनेनुसार कार्यालयात हजर व्हावे लागणार आहे. या संदर्भात विद्यापीठाने सर्वच महाविद्यालयांना सूचना दिल्या आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेत मोडणाºया आरोग्य केंद्र, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग, पाणी पुरवठा, विद्युत पुरवठा व इतर सेवा पुरविणाºया प्रशासकीय विभाग प्रमुखांनी आवश्यक निर्णय घेण्याचेही विद्यापीठाने सूचित केले आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाcollegeमहाविद्यालयexamपरीक्षा