चान्नी येथे वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:18 IST2021-03-06T04:18:02+5:302021-03-06T04:18:02+5:30

येथील एक ज्येष्ठ नागरिक हे सुनेसोबत प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालय अकोला येथे गेले. या ठिकाणी त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांचा ...

Corona dies of old age at Channi | चान्नी येथे वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

चान्नी येथे वृद्धाचा कोरोनाने मृत्यू

येथील एक ज्येष्ठ नागरिक हे सुनेसोबत प्रसूतीसाठी स्त्री रुग्णालय अकोला येथे गेले. या ठिकाणी त्यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना, ४ मार्च रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अकोला येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. चान्नी येथे कोरोनाचे ९ जण पॉझिटिव्ह आल्याने चान्नी गावात भीतीचे वातावरण आहे. मृत्यू पावलेले हे ज्येष्ठ नागरिक शेगाव येथील गजानन महाराज मंदिरात दर महिन्याला चान्नी येथील स्वयंसेवक मंदिरात नेत होते. त्यांच्या मृत्यूने चान्नी गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, पत्नी व मुली व नातवंड असा परिवार आहे.

Web Title: Corona dies of old age at Channi