बोरगावात आज कोरोना निदान स्वॅब तपासणी शिबिर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:29 IST2021-02-23T04:29:18+5:302021-02-23T04:29:18+5:30
बोरगाव मंजू : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोविड आजाराच्या विळख्यात सापडलेल्या बोरगाव मंजू येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला हाेता. ...

बोरगावात आज कोरोना निदान स्वॅब तपासणी शिबिर!
बोरगाव मंजू : गतवर्षी मार्च महिन्यापासून कोविड आजाराच्या विळख्यात सापडलेल्या बोरगाव मंजू येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला हाेता. मात्र अचानक गत आठवड्यात नव्याने १४ काेराेनाबाधित रुग्णांची भर पडल्यामुळे नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार रविवारी सकाळपासून बोरगाव मंजू येथील जनतेने नियमांचे काटेकोरपणे पालन करून संसर्ग होऊ नये, यासाठी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, मंगळवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड निदान स्वॅब तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तर येथील आठवडी बाजार हा दर मंगळवारी भरतो तर तो भरणारा बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवला आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, नियमित मास्क लावून काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. बोरगाव मंजू येथील आठवडी बाजारात २० ते २५ नजीकच्या खेडी जोडलेली असून, बाजार बंद असल्याने ग्रामीण भागातील नागरिक, दुकानदार व व्यापाऱ्यांनी येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड निदान स्वॅब तपासणी शिबिरात शहरातील व्यापारी, दुकानदार, भाजीपाला व्यवसायिक, पानटपरी, आदींनी आपली कोविड निदान स्वॅब तपासणी करून घ्यावी अन्यथा त्यांचावर कारवाई करण्यात येईल, तसेच ज्यांना कोविडची लक्षणे असतील तसेच सर्व सामान्य जनतेनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभाग पोलीस विभाग, ग्रामपंचायत प्रशासनाने केले आहे.