कोरोना: एकाचा मृत्यू; सहा पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:51+5:302021-07-17T04:15:51+5:30

प्राप्त अहवालानुसार, शुक्रवारी ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगाव मंजू परिसरातील वाशिंबा येथील रहिवासी होता. ...

Corona: death of one; Six positives! | कोरोना: एकाचा मृत्यू; सहा पॉझिटिव्ह!

कोरोना: एकाचा मृत्यू; सहा पॉझिटिव्ह!

प्राप्त अहवालानुसार, शुक्रवारी ५४ वर्षीय पुरुष रुग्णाचा कोविडमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण बोरगाव मंजू परिसरातील वाशिंबा येथील रहिवासी होता. या रुग्णाला १५ जुलै रोजी सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या मृत्यूसोबतच जिल्ह्यातील एकूण मृतांचा आकडा १ हजार १३३ वर पोहोचला आहे. दरम्यान सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४७ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृहविलगीकरणात असल्याची माहिती आहे.

मनपा क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, सहापैकी पाच रुग्ण हे महापालिका क्षेत्रातील आहेत, तर एक रुग्ण हा बार्शीटाकळी तालुक्यातील आहे. अकोला तालुक्यासह उर्वरित पाचही तालुक्यात एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

Web Title: Corona: death of one; Six positives!