कोरोना: दोघांचा मृत्यू; २० पॉझिटिव्ह!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:20+5:302021-06-25T04:15:20+5:30

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, दोन्ही मृत्यू हे बार्शीटाकळी तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये अकोली बेस येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांना ...

Corona: Death of both; 20 Positive! | कोरोना: दोघांचा मृत्यू; २० पॉझिटिव्ह!

कोरोना: दोघांचा मृत्यू; २० पॉझिटिव्ह!

गुरुवारी प्राप्त अहवालानुसार, दोन्ही मृत्यू हे बार्शीटाकळी तालुक्यातील आहेत. मृतांमध्ये अकोली बेस येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. त्यांना १८ जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच बार्शीटाकळी येथील ८४ वर्षीय महिलेचा महिलेला २० जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पॉझिटिव्ह अहवालामध्ये १० रॅपिड अँटिजन चाचणीचे, तर १० आरटीपीसीआर चाचणींचा समावेश आहे. जिल्ह्यात मृतांची एकूण संख्या १,१२४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५७ हजार ५०९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापैकी ५५ हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत ४२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुकानिहाय रुग्ण (आरटीपीसीआर अहवाल)

तालुका - रुग्ण

अकोट - ०३

पातूर - ०१

तेल्हारा - ०३

अकोला (मनपा क्षेत्र) - ०३

Web Title: Corona: Death of both; 20 Positive!