शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘कोरोना’मुळे रंग काळवंडले; पेंटर झाले ‘बेरंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 14:52 IST

घर रंगविणाºयांना किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : साधारणत: जानेवारी ते जून हा काळ पेंटरसाठी अतिशय अनुकूल असतो. या काळात नवीन बांधकामे झालेली असतात तर जुन्या घरांवर नवीन रंगरंगोटी करण्यासाठी नागरिक उत्सुक असतात; मात्र चीनपासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रसार भारतातही झाला आणि मार्चपासून संपूर्ण भारत लॉकडाउनमध्ये गेला. इतर रोजगारांप्रमाणे पेंटरही घरीच बसून राहिले. कोरोनाच्या भीतीचा रंग हा दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याने घर रंगविणाºयांना किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी केलेल्या लॉकडाउनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावतील तर रोज खातील, अशी अवस्था असणाºयांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यम वर्गावर हा मार जास्त पडत असल्याचे दिसून येते. हा वर्ग अतिशय स्वाभिमानी असल्याने स्थिती दयनीय आहे. घरादारांना रंगसाज चढवून चकचकीत करणारे पेंटर मध्यम वर्गातच मोडतात. लॉकडाउनमुळे किमान वर्षभर तरी ते बेरंग राहण्याची भीती निर्माण झाली आहे. जानेवारी ते जून या काळात पेंटरला काम भरपूर असते. आॅर्डरप्रमाणे काम करावे आणि आपला पैसा घरी न्यावा, अशी दैनंदिनी असलेल्या या वर्गावर आता उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. महिनाभरापासून हाताला काम नाही म्हणून पैसाही नाही. असे जवळपास दोन हजार हजार पेंटर्स सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या बेरोजगारीच्या संकटाशी झुंज देत आहेत. सध्या लॉकडाउन सुरू आहे आणि कधी उठेल, याचा नेम नाही. लॉकडाउन उठल्यावरही जीवनमान सुरळीत होण्यास बराच वेळ जाणार आहे. त्यातच पावसाळ्यात पेंटिंगची कामे नसतात. दिवाळीत कामे निघत असली तरी यंदा उन्हाळ्याची तूट भरून काढण्याकडेच नागरिकांचा प्रथम कल असेल. अशा स्थितीत पेंटर वर्ग दयनीय अवस्थेत जाण्याची शक्यता आहे. वर्षभर तरी पेंटर्स वर्ग विनारोजगार राहण्याची भीती निर्माण झाली आहे.

बांधकाम मजूर अंतर्गत अनेक पेंटरची नोंद आहे; मात्र त्यामध्ये सर्वच पेंटरचा समावेश नाही. हे कामगार परिश्रमी आहोत आणि कुणापुढे कधी हात पसरवत नाहीत. त्यांना शासनाने साथ दिली नाही तर या पेंटरचे संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त होण्याची भीती आहे. त्यामुळे शासनाने विशेष योजना आखून मदत देण्याची गरज आहे. - कॉ. नयन गायकवाड, आयटक राज्य कौन्सिल सदस्य

सर्वच पेंटरच्या हातांना काम नाही, मी अकोट फैलमध्ये राहतो. या परिसरात माझ्यासारखे हातावर पोट असणारे अनेक कामगार आहेत. आमच्यापर्यंत कोणतीच मदत पोहोचली नाही. अनेकांच्या बांधकाम मजूर म्हणून नोंदी नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे पालकमंत्री व शासनाने लक्ष घालून शासकीय योजनेतून प्रत्येक पेंटरला या काळात मदतीचा हात देण्याची गरज आहे.- राजानंद डोईफोडे, पेंटर अकोट फैल.

टॅग्स :Akolaअकोलाpaintingचित्रकलाcorona virusकोरोना वायरस बातम्या