शहरं
Join us  
Trending Stories
1
KKR ने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला; जाणून घ्या किती षटकांचा होणार सामना     
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

Corona Cases : कोरोनाचे आणखी नऊ बळी, २७४ नव्याने पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 5:09 PM

Corona Cases in Akola : आणखी नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५२५ झाला आहे.

अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, मंगळवार, १३ एप्रिल रोजी आणखी नऊ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५२५ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १३७, तर रॅपिड अँटिजेन चाचण्यांमध्ये १३७ अशा २७४ नव्या पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ३१,३०० वर पोहोचली आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६८३ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १९९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ५४६ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अमाखाँ प्लॉट व मोठी उमरी येथील प्रत्येकी नऊ, कौलखेड, खडकी, गोरक्षण रोड, गीता नगर, पारस कॉलनी व मलकापूर येथील प्रत्येकी पाच, जीएमसी, बार्शीटाकळी, राम नगर व तोष्णीवाल लेआऊट येथील प्रत्येकी चार, पिंजर, कोलोरी, रणपिसे नगर व राऊतवाडी येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड, बोरगाव मंजू, बाळापूर, अकोट, ख्रिरपूर, शिवार, जठारपेठ, देवकी नगर व हरिहर पेठ येथील प्रत्येकी दोन, हिंगणा, गोकूल कॉलनी, न्यू बस स्टँड, लक्ष्मी नगर, गड्डम प्लॉट, वनीरंभापूर, देशमुख फैल, सोपीनाथ नगर, शिवाजी नगर, पार्वती नगर, निंभोरा,पैलपाडा, देगाव, दहिहांडा, तेल्हारा, पातूर, मांडोली, कंळबा ता.बाळापूर, हसनापूर, गोकूल कॉलनी, खामखेड, पारस, शेलद, राजीव गांधी नगर, रिंग रोड, दानोरी ता.अकोट, राधेनगर, गौतम रोड, सिंधी कॅम्प, रतनलाल प्लॉट, लहान उमरी, तेल्हारा, जवाहर नगर, व्याळा ता.बाळापूर, वर्धमान नगर, मातानगर, शिवनी, महाकाली नगर, शिवसेना वसाहत, गोपालखेड, वाडेगाव, रामदासपेठ व विराहित येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नऊ जणांचा मृत्यू

हमजा प्लॉट, जूने शहर येथील ४४ वर्षीय महिला, नायगाव येथील ४० वर्षीय महिला, आळसी प्लॉट येथील ६५ वर्षीय महिला, पारस येथील ४२ वर्षीय पुरुष, शास्त्री नगर येथील ८१ वर्षीय पुरुष, भरतपूर ता.बाळापूर येथील ७४ वर्षीय पुरुष, शिवसेना वसाहत येथील ५८ वर्षीय पुरुष, खदान येथील ७४ वर्षीय पुरुष व दगडपारवा येथील ३६ वर्षीय पुरुष अशा नऊ रुग्णांचा मंगळवारी उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

 

४,०१२ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१,३०० जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २६,७६३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५२५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४,०१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या