Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, २० नव्याने पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 19:06 IST2021-06-25T19:06:24+5:302021-06-25T19:06:31+5:30
Corona Cases in Akola : २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७,५२९ वर गेली आहे.

Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, २० नव्याने पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरली असली, तरी मृत्यू सत्र सुरुच असून, शुक्रवार, २५ जून रोजी आणखी दाोघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १,१२६ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १२ व रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ८ असे एकूण २० नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७,५२९ वर गेली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी एकूण ७७३ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी १२ पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित ७६१ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अकोट तालुक्यातील एक, तेल्हारा तालुक्यातील चार, बार्शीटाकळी तालुक्यातील एक , मुर्तिजापूर तालुक्यातील एक व अकोला मनपा क्षेत्रातील पाच जणांचा समावेश आहे. शुक्रवारी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. यामध्ये वाडेगाव ता.बाळापूर येथील ५५ वर्षीय महिला व दहिहांडा ता.अकोट येथील ४६ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
२८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून आठ, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर येथील एक व खासगी कोविड रुग्णालयांमधील १९ अशा एकूण २८ जणांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४१३ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५२९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५५,९९० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४१३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.