Corona Cases in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, ६८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 18:39 IST2021-06-12T18:38:58+5:302021-06-12T18:39:06+5:30
Corona Cases in Akola: १२ जून रोजी कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ११११ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी तिघांचा मृत्यू, ६८ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात शनिवार, १२ जून रोजी कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ११११ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४४, तर रॅपिड ॲन्टिजन चाचण्यांमध्ये २४ असे एकूण ६८ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५७१०१ झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ५४० अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून, उर्वरित ४९६ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. शनिवारी दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये चरणगाव ता. पातूर येथील ७० वर्षीय महिला, बार्शीटाकळी येथील ६१ वर्षीय पुरुष व बोरगाव मंजू येथील ५० वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्ण संख्या
मुर्तिजापुर-नऊ, अकोट-पाच, बाळापूर-पाच, बार्शीटाकळी- एक, पातूर-दोन, तेल्हारा-एक, अकोला-२१. (अकोला ग्रामीण-१०, अकोला मनपा क्षेत्र-११)
२२८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, आर्युवेदिक महाविद्यालय येथील पाच, खासगी कोविड रुग्णालयांमधील २४, तर होम आयसोलेशन मधील १८० अशा एकूण २२८ जणांना शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला.
१,५७७ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,१०१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५४,४१३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १,५७७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.