Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 19:53 IST2021-05-05T19:52:52+5:302021-05-05T19:53:05+5:30
Corona Cases in Akola : ४ मे रोजी जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने, कोरोनाबळींचा आकडा ७३७ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी सहा जणांचा मृत्यू, ७१८ कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : कोरोना संसर्गाची साखळी खंडित होण्याची कोणतीही चिन्हे नसून, मंगळवार, ४ मे रोजी जिल्ह्यात आणखी सहा रुग्णांचा मृत्यू झाल्याने, कोरोनाबळींचा आकडा ७३७ वर पोहोचला आहे, तर गत चोवीस तासांत आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ४८४, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये २३४ असे एकूण ७१७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्याने, आतापर्यंत बाधित झालेल्यांचा आकडा ४२,४२७ वर पोहोचला आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे २,२७९ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ४८४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित १,७९५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील ४८, अकोट तालुक्यातील ६२, बाळापूर तालुक्यातील ३०, तेल्हारा तालुक्यातील ३५, बार्शी टाकळी तालुक्यातील २९, पातूर तालुक्यातील तीन आणि अकोला - २७७ (अकोला ग्रामीण- ६६, अकोला मनपा क्षेत्र- २११) रुग्णांचा समावेश आहे.
येथील रुग्णांचा मृत्यू
पारस ता.बाळापूर येथील ४० वर्षीय पुरुष
पिंजर ता. बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय महिला
बाळापूर येथील ४६ वर्षीय पुरुष
पारस ता. बाळापूर येथील ४० वर्षीय महिला
लहान उमरी येथील ७५ वर्षीय महिला
वनी रंभापूर येथील ७३ वर्षीय महिला
४७५ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३६, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील सहा, अकोला ॲक्सिडेंट येथील तीन, देवसार हॉस्पिटल येथील तीन, क्रिस्टल हॉस्पिटल येथील एक, यकीन हॉस्पिटल येथील एक, बबन हॉस्पिटल येथील दोन, इन्फिनिटी हॉस्पिटल येथील एक, आयकॉन हॉस्पिटल येथील पाच, ओझोन हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल रिजेन्सी येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील तीन, नवजीवन हॉस्पिटल येथील एक, इंदिरा हॉस्पिटल येथील दोन, फातिया हॉस्पिटल येथील दोन, अर्थव हॉस्पिटल येथील दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, खैर उम्मत हॉस्पिटल येथील दोन, लोहाणा हॉस्पिटल येथील चार, कोविड केअर सेंटर बार्शिटाकळी तीन, केअर हॉस्पिटल येथील दोन, हॉटेल स्कायलार्क येथील एक, आरकेटी आयुर्वेदिक महाविद्यालय येथील तीन, तर होम आयसोलेशनमधील ३८० अशा एकूण ४७५ जणांना मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,६९२ उपचाराधीन रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४२,४२७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ३५,९९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ७३७ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,६९२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.