Corona Cases in Akola : आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 19:44 IST2021-08-08T19:44:19+5:302021-08-08T19:44:45+5:30
Corona Cases in Akola: सहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ५७७८९ झाली आहे.

Corona Cases in Akola : आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार होत असून, रविवार, ८ ऑगस्ट रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये तीन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये तीन असे एकूण सहा नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या ५७७८९ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून रविवारी २६६ आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी मुर्तीजापूर, अकोला ग्रामीण व अकोला मनपा क्षेत्रातील प्रत्येकी एक अशा तीघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित २६३ अहवाल निगेटिव्ह आहेत. शनिवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ४३९ रॅपिड ॲंटिजन चाचण्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून शनिवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये तीन जण पॉझिटिव्ह आढळून आले.
ॲक्टिव्ह रुग्ण ५८
जिल्ह्यात आतापर्यंत ५७,७८९ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी ५६,५९७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.