Corona Cases in Akola : ९७१ चाचण्यांमध्ये केवळ तीन पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 19:14 IST2021-07-28T19:14:47+5:302021-07-28T19:14:56+5:30
Corona Cases in Akola: आता जिल्ह्यात केवळ ५३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Corona Cases in Akola : ९७१ चाचण्यांमध्ये केवळ तीन पॉझिटिव्ह
अकोला : कोरोना संसर्गाची लाट आता पूर्णत: ओसरली असून, जिल्ह्यात २८ जुलै रोजी सायंकाळी संपलेल्या २४ तासात करण्यात आलेल्या ९७१ चाचण्यांमध्ये (आरटीपीसीआर ४२० व रॅपिड ॲन्टिजेन ५५१) केवळ तीन पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत बाधितांची संख्या ५७,७५८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे एकूण ४२० तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये पातूर, हातरुण ता.बाळापूर व शास्त्री नगर अकोला येथील प्रत्येकी एक अशा तीघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. उर्वरित ४१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. मंगळवारी दिवसभरात झालेल्या ५५१ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही.
सहा जण कोरोनामुक्त
बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पाच व बिहाडे हॉस्पिटल येथून एक अशा एकूण सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता जिल्ह्यात केवळ ५३ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आतापर्यत ५६,५७१ जणांनी कोरोनावर मात केली असून, ११३४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.