Corona Cases in Akola : केवळ तीन नवे रुग्ण, १३ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 19:15 IST2021-06-28T19:13:53+5:302021-06-28T19:15:49+5:30
Corona Cases in Akola : दोन रुग्ण हे तेल्हारा तालुक्यातील आहेत, तर मुर्तीजापूरात एक रुग्ण आढळून आला.

Corona Cases in Akola : केवळ तीन नवे रुग्ण, १३ कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात कोरोनाची लाट आता पूर्णपणे ओसरल्याचे चित्र असून, सोमवार, २८ जून रोजी आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये दोन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये एक अशा एकूण तीन नव्या रुग्णांची नोंद झाली. यापैकी दोन रुग्ण हे तेल्हारा तालुक्यातील आहेत, तर मुर्तीजापूरात एक रुग्ण आढळून आला. अकोला शहरासह इतर पाच तालुक्यांमध्ये दैनंदिन रुग्णसंख्या निरंक आली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी एकूण १२२ जणांचे चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी तेल्हारा तालुक्यात दोन पॉझिटिव्ह आढळून आले, तर उर्वरित १२० जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. रविवारी करण्यात आलेल्या ४२३ चाचण्यांमध्ये केवळ मुर्तीजापूरात एक जण पॉझिटिव्ह आढळून आला.
१३ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून सहा, बिहाडे हॉस्पीटल येथील एक, फातेमा हॉस्पीटल येथील तीन, अवघाते हॉस्पीटल येथील एक, केअर हॉस्पीटल येथील दोन, अशा एकूण १३ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४१२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७,५७१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५६,०३३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,१२६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४१२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.