Corona Cases in Akola : आणखी चार जणांचा मृत्यू, १५६ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 18:31 IST2021-05-31T18:31:46+5:302021-05-31T18:31:52+5:30
Corona Cases in Akola: सोमवार, ३१ मे रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०६९ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी चार जणांचा मृत्यू, १५६ पॉझिटिव्ह
अकोला : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा आलेख घसरणीला लागला असून, सोमवार, ३१ मे रोजी आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा १,०६९ वर पोहोचला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ११३, तर रॅपिड अँटिजन चाचण्यांमध्ये ४३, असे एकूण १५६ रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ५५,६७७ झाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १,००४ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ११३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ८९१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सोमवारी चौघांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोट येथील ५० वर्षीय पुरुष, केशव नगर येथील ५६ वर्षीय महिला, वाडी अदमपूर ता.तेल्हारा येथील ६७ वर्षीय महिला व करतवाडी ता.अकोट येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या
मुर्तिजापुर- १८, अकोट- ३७, बाळापूर-आठ, बार्शीटाकळी- ११, पातूर-एक, तेल्हारा-१२ अकोला-२६. (अकोला ग्रामीण-२, अकोला मनपा क्षेत्र-२४)
४११ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २३, पीकेव्ही जॅम्बो हॉस्पीटल, खासगी कोविड रुग्णालयांमधील ४६, तर होम आयसोलेशन मधील ३२६ अशा एकूण ४११ जणांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला.
४,३५१ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५,६७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल ५०,२५७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १,०६९ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ४,३५१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.