Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; चार पॉझिटिव्ह, सहा कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 19:08 IST2021-08-12T19:08:45+5:302021-08-12T19:08:56+5:30
Corona Cases in Akola: एका अज्ञात रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११३५ वर पोहोचला आहे.

Corona Cases in Akola : आणखी एकाचा मृत्यू; चार पॉझिटिव्ह, सहा कोरोनामुक्त
अकोला : जिल्ह्यात गुरुवारी (१२ ऑगस्ट) आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये तीन, तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये एक असे चार नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकुण रुग्णसंख्या ५७,७९९ झाली आहे. दरम्यान, एका अज्ञात रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ११३५ वर पोहोचला आहे.
सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून गुरुवारी ३०८ आरटीपीसीआर चाचणी अहवाल प्राप्त झाले. यापैकी अकोला मनपा क्षेत्रातील दोघांचा, तर अकोला ग्रामीण भागातील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. उर्वरित ३०५ अहवाल निगेटिव्ह आहेत. बुधवारी दिवसभरात करण्यात आलेल्या ४७३ रॅपिड अँटिजन चाचण्यांचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आला. यामध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला.
४४ ॲक्टिव्ह रुग्ण
होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत असलेल्या आणखी पाच व रुग्णालयातील एक अशा सहा जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत ५६,६२० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. १,१३५ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.